बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ : महाराष्ट्रात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार ?

0

मुंबई : बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे पुढील सहा तासात चक्रीवादळात रुपांतर होणार असून त्याचे चक्रीवादळात रुपांतर झाल्यानंतर ‘गुलाब’ असं ह्या चक्रीवादळाचं नाव देण्यात आले असून पाकिस्तानकडून हे नाव देण्यात आले आहे. दक्षिण ओडिशा – उत्तर आंध्र प्रदेश दरम्यानच्या कलिंगपट्टणमजवळ किनारपट्टीला हे चक्रीवादळ २६ सप्टेंबरला संध्याकाळी धडकण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे.

बंगालच्या उपसागरात २०२१ मध्ये निर्माण होणारे हे तिसरे चक्रीवादळ असेल. ह्याआधी तौक्ते, यास चक्रीवादळं आली होती. आता गुलाब या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात २६ ते २९ सप्टेंबरदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्याचसोबत वाऱ्यांचा वेग देखील अधिक राहण्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. चक्रीवादळाची तीव्रता कमी झालेले क्षेत्र महाराष्ट्र ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याचा अंदाज आहे. त्यामुळे महाराष्ट्रात उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्राला याचा फटका बसणार नसला तरी त्याचा प्रभाव मात्र नक्कीच जाणवणार आहे. त्यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे तर उत्तर मध्य महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भात या चक्रीवादळाचा प्रभाव अधिक राहण्याचा अंदाज आहे. दरम्यान, चक्रीवादळ किनारपट्टीला धडकल्यानंतर त्याचा वेग कमी होणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.