मुंबई,१३ फेब्रुवारी २०२३ –तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस सिजन १६ चा विजेता ठरला आहे.बिग बॉस १६ ची सुरूवात १ ऑक्टोबर २०२२ पासून झाली होती. यादरम्यान घरातील स्पर्धेकांनी जबरदस्त मनोरंजन केले .बिग बिग बॉसच्या १६ व्या सीजनने सुरूवातीपासूनच टीआरपीमध्ये धमाका केला आहे. शिव ठाकरे, एमसी स्टॅन , प्रियांका चौधरी , अर्चना गौतम आणि शालिन भनोट हे टॉप ५ मध्ये दाखल झाले होते. बिग बॉसच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच बिग बॉसचा ग्रँड फिनाले हा तब्बल पाच तासा पेक्षाही अधिक वेळ चालला.प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅन यांच्यात चुरशीची लढत अपेक्षित सुरूवातीपासूनच होती
सुरुवातीला शालिन भनोट टॉप ५ मधून बाहेर पडला. त्यानंतर अर्चना गौतम बाहेर पडली त्यांनतर एमसी स्टॅन शिव आणि प्रियांका हे स्पर्धक टॉप थ्री मध्ये दाखल झाले.पण शिव आणि प्रियांका फायनल मध्ये लढत होणार असे वाटत होते.पण प्रियांका टॉप थ्री मधून आश्चर्यकारक पद्धतीने बाहेर पडली त्यामुळे फायनल मध्ये शिव ठाकरे, एमसी स्टॅन यांच्यात लढत होऊन तरुणांच्या गळ्यातला ताईत असलेला एमसी स्टॅन हा बिग बॉस सिजन १६ चा विजेता ठरला.
सुरूवातीपासूनच मंडळीची इच्छा होती की, काहीही झाले तरीही बिग बॉस १६ ची ट्रॉफी ही मंडळीकडेच आली पाहिजे. शेवटी तेच घडले आणि बिग बॉस १६ ची ट्रॉफी मंडळीकडेच आलीये.फायनलमध्ये शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन हे दोघेजण होते. वोट सर्वात जास्त मिळाल्याने एमसी स्टॅन हा बिग बॉस १६ चा विजेता झाला. मंडळीकडे ट्रॉफी आल्याने सर्वांनाच मोठा आनंद झाला.
एमसी स्टॅन हा एक रॅपर असून तो पुण्यातील आहे. सुरूवातीपासून एमसी स्टॅन याचा गेम जबरदस्त होता. तो कधीही घरामध्ये नाटक करताना दिसला नाही. मंडळीमधील महत्वाचा सदस्य एमसी स्टॅन हा होता.सलमान खान याने एमसी स्टॅन याला बिग बॉसची ट्रॉफी दिली. हिरे आणि सोन्यापासून ही ट्रॉफी बनवण्यात आलेली आहे.ट्रॉफीची किंमत ९ लाख ३४ हजार आहे.या ट्रॉफीवर हिऱ्यांचे सुंदर काम करण्यात आले आहे. ही अत्यंत खास ट्रॉफी आहे.ट्रॉफी बरोबर स्टॅनला ३१ लाख ८० हजारांची रक्कम आणि एक कार असे पारितोषिक देणार आले