शनिवारी संपूर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा बंद

0

नाशिक,दि, १० जुलै २०२४ –नाशिक शहरात पाणी पुरवठा विभागातील विविध ठिकाणी पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिन्या तसेच उप वितरण वाहिन्यांची दुरुस्ती तसेच व्हॉलची दुरुस्ती , व्हॉल बदलणे इत्यादी देखभाल दुरुस्तीचे कामे होणार असून गंगापुर धरण पंपीग स्टेशन येथील सिव्च यार्ड चेंज ओव्हर स्ट्रक्ररची कामे करणे पाणी पुरवठा सुरळीत होणे कामी हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे गंगापुर धरण पंपिंग स्टेशन व मुकणे पंपिंग स्टेशन येथील पंपिंग बंद ठेवावे लागणार आहे

या सर्व कामांमुळे संपुर्ण नाशिक शहराचा पाणी पुरवठा शनिवार दि. १३/०७/२०२४ रोजी सकाळी ९.०० वाजेपासुन पुर्ण दिवस होऊ शकणार नाही. तसेच रविवार दि. १४/०७/३०२४ रोजी सकाळचा संपुर्ण नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील पाणी कमी दाबाने होईल, याची नागरीकांनी नोंद घ्यावी व मनपास सहकार्य करावे ही विनंती नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.