नाशिकच्या तरुणाईचे गाणे “ ये पुन्हा माझ्याकडे ”

0

नाशिक – म्युझोमेंट इंटरटेनमेंटतर्फे नुकतेच “ ये पुन्हा माझ्याकडे ” हे गाणे रिलीज झाले आहे. अथर्व ढगे ह्याने हे गाणे लिहिले असून इंडियन आयडॉल फेम नचिकेत लेले ह्याने हे गाणे गायलेले आहे. साधारण एप्रिल – मे च्या दरम्यान ह्या गाण्याची संकल्पना समृद्ध वावीकर ह्याच्या मनात आली. त्याने एक धून बनवून अथर्व ढगेलापाठवली आणि दुसऱ्याच दिवशी अथर्वने त्यावर एक उत्तम गाणे रचून दिले.

त्यावेळीस असलेला कोव्हीड काळ आणि बंधने ह्यामुळे ह्या गाण्य्चे सगळे प्री-प्रोडक्शनचे काम ऑनलाईन माध्यमातून पूर्णत्वास झाले. समृद वावीकर ह्यांनी हे गाणे कंपोज केलेले असून ह्या गाण्याची संकल्पना हि त्याचीच आहे.ह्या गाण्याला साज आला आहे तो इंडियन आयडॉल फेम नचिकेत लेले ह्याच्या आवाजानेच ! इंडियन आयडॉल नंतरचा त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट.त्यामुळे त्यानेही त्याची चमक ह्या गाण्याला लावलेली आहे.  

Nashik youth's song

गाण्याबद्दल –  

 

प्रत्येक मुलीच्या मनात कोणी एक असतो जो तिला तिचा म्हणून हवा असतो. पण जेव्हा तोच त्या मुलीला सोडून जातो, तेव्हा तिच्याकडे फक्त आठवणी उरतात.त्यांच्यातील छोट्या छोट्या गोष्टीमागेसुद्धा बऱ्याच आठवणी दडलेल्या असतात. ताटातूट झाल्यानंतर तीच गोष्ट आपल्याला असंख्य आठवणी, घटना, प्रसंग त्रासदायक पद्धतीने दाखवायला लागते. आपण भाबड्या कल्पनेत रमायला लागतो..आणि रडवेल्या स्वरात हाक देतो की, “ये पुन्हा माझ्याकडे..” 

 

तांत्रिक बाजू – 

 

ह्या गाण्याची स्टोरी हि, गाण रेकोर्ड झाल्यानंतर बनवण्यात आलेली आहे. तस ते खूप चँलेन्जिंग काम होत.पण हि बाजू कुंतक सु. गायधनी व  पीयूष भानोसे ह्यांनी उत्तम रीतीने सांभाळली, सोबतच ह्या गाण्याचे दिग्दर्शन हि कुंतक सु. गायधनी ह्याने केलेले असून कँमेऱ्याची बाजू हि पीयूष भानोसे व आदित्य राहणे ह्यांनी सांभाळली आहे. त्यामुळेच हे  त्यामुचे गाणे बघतांना स्टोरीमध्ये एक आल्हाददायकपणा आलेला आहे.ह्या गाण्यात तन्वी किरण व विनीत पंडित ह्यांनी अभिनय केलेला आहे. गाण्याच्या मूड धरून ठेवत तन्वीने अभिनय केल्यामुळे गाणे अजून उजवे वाटते. ह्यासाठीची विरुद्ध भूमिका विनीत पंडित याने रंगवल्याने अभिनय आणि गाणे हे सोबत पोहचते.

 

सोशल मिडिया बद्दल –

 

गाणे रिलीज झाल्या पासून ५ दिवसात ह्या गाण्याला जवळजवळ पंधरा हजाराच्या आसपास व्ह्यूअर्स मिळाले आहे तसेच मराठी भाषा सोडून इतर भाषिक देखील ह्या गाण्यच्या सांगिताला, आवाजाला, कथेला चांगली कमेंट देत आहे.

 

वेगळेपण – 

 

1) हे गाणे बनवण्यापासून ते प्रकाशित होई पर्यंत ह्यात सहभागी असणारे लोक आहे ते ९०% हे २५ वर्षा खालचे आहेत. सगळ्यांची हि पहिलीच वेळ आहे.

 

2) हे गाणे 4 दिवसात शूट झाले आणि ५ दिवसात एडीट झालेले गाणे आहे. एवढ्या कमी वेळात हे प्रकाशित झालेले आहे.     

Nashik youth's song

गाण्यातील सहभागी 

 

शब्द – अथर्व ढगे, संगीत – समृद्ध वावीकर व सिद्धार्थ वैद्य ह्यांचे आहे. स्वर – नचिकेत लेले, संगीत दिग्दर्शन – समृद्ध वावीकर, संगीत संयोजन – सौरभ कुलकर्णी, कोरस , निकिता दौंड, साक्षी आरेकर, साईशा केळकर, पियानिका – समृद्ध वावीकर, गिटार – शुभंकर हिंगणे

 

रेकाँर्डिंग, मिक्सिंग व मास्टर –  शुभम जोशी, मृदुला कुलकर्णी, (फेदर टच स्टुडीओ)   

 

कथा – कुंतक सु. गायधनी व पीयूष भानोसे, दिग्दर्शन – कुंतक सु. गायधनी, अभिनय – तन्वी किरण व विनीत पंडित, कँमेरा- पीयूष भानोसे व आदित्य रहाणे,संकलन – पीयूष भानोसे, रंगसंगती – आदित्य रहाणे, वेशभूषा – नेहा रत्नपारखी, इंग्रजी भाषांतर – उ.प्रथम

 

सोशल मिडिया व प्रमोशन – अजिंक्य जोशी व ग्राफिक्स सोहम देशपांडे, विधीज्ञ सहकार्य – अँड. अमोल वावीकर, विशेष आभार – MTDC महाराष्ट्र शासन, डीयोनीज बिस्ट्रो, हेमंत बेळे, रुचा अदमाने,नकुल भानोसे  

 

     
गाण्याची लिंक – https://youtu.be/YSa-3unbN_I

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.