प्रार्थना बेहरेच मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण

0

मुंबई – हिंदी टेलिव्हिजन माध्यमातून आपल्या अभिनय क्षेत्रातील करियरची सुरुवात करणारी तसेच अनेक चित्रपट आणि मालिकांतून प्रेक्षकांना आपल्या अभिनयाची भुरळ पाडणारी प्रार्थना आता मराठी टेलिव्हिजनच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे प्रार्थना चक्क ११ वर्षांनी झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या आगामी मालिकेतून मराठी टेलिव्हिजनवर पदार्पण करणार आहे.२३ ऑगस्ट पासून  मालिका रात्री ८:३० वाजता रसिकप्रेक्षकांनाच्या भेटीला येणार आहे.

प्रार्थना बेहरेच मराठी टेलिव्हिजनवर पदार्पणहोणार असल्याने  प्रेक्षक चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रार्थनाने आपल्या  सौंदर्याने आणि अभिनयाने महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियाच्या माध्यमावरही प्रार्थना नेहमीच ऍक्टिव्ह असते आणि ती नियमित  तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. प्रार्थना गेली दोन वर्ष चित्रपटांपासून पासून दूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना भेटताना आनंद होतो आहे असं प्रार्थना म्हणते.

पुन्हा मालिकेमध्ये पदार्पण करण्याबद्दल काय म्हणते प्रार्थना

“मला गेली अनेक वर्ष खूप मालिकांच्या ऑफर येत होत्या .परंतु, तेव्हा मी फक्त चित्रपट करायचं ठरवलं होतं. मी जाणूनबुजून मालिकांना नकार देत गेले. परंतु, आता जवळपास दोन वर्ष माझा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. मला चाहते वारंवार एकच प्रश्न विचारताय की प्रार्थना मॅम तुमचा पुढचा चित्रपट कधी येणार. त्यावर माझ्याकडे काहीच उत्तर नव्हतं. मी कुठे गायब आहे, असं चाहते मला विचारायचे.” पुढे प्रार्थना म्हणाली,

“यावरून मला एक कळालं, चाहते आपल्याला पाहायला उत्सुक असतात. परंतु, जेव्हा तुम्ही सगळ्यांच्या दृष्टीआड होता तेव्हा तुम्ही इतरांच्या डोक्यातूनही निघून जाता. तुम्ही काय करता याचा कोणाला फारसा फरक पडत नाही. त्यामुळे इथे तुम्हाला तुमच्या असण्याची समोरच्याला जाणीव करून द्यावी लागते. मी प्रेक्षकांच्या विस्मरणात जाऊ नये म्हणून मी मालिका करण्याचा निर्णय घेतला. मी अनेक वर्षांनंतर मालिका करत आहे त्यामुळे दिग्दर्शकांना मी मला नवीन कलाकाराप्रमाणे वागणूक देण्यासाठी बजावलं आहे कारण मला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत.” मालिकेत प्रार्थनासोबत मराठी आणि हिंदी चित्रपटात आपला वेगळा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे मुख्य भूमिकेत आहे. मालिकेतून श्रेयसदेखील जवळपास १७ वर्षांनी छोट्या पडद्यावर परतणार आहे. मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकही मालिकेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.