विशाल आणि विकासमध्ये पुन्हा एकदा राडा होणार ! कोणी केला विश्वासघात ?

0

मुंबई आजच्या टास्कमध्ये विकास आणि विशालमध्ये पुन्हाएकदा जबरदस्त राडा होणार आहे. घरातील समीकरण बदलताना दिसतं आहेत. प्रत्येक सदस्य individual गेम खेळणार असे दिसून येत आहे. तर टास्क असा असणार आहे, तात्या यांच्या स्पेसशिपचे इंधन संपले आहे, प्रत्येक सदस्याला त्यांच्या टीममधील सदस्यांच्या मदतीने स्पेसशिपमध्ये इंधन भरायचे आहे. आणि यावरूनच पडली विकास आणि विशालमध्ये वादाची ठिणगी. विकासचे म्हणणे आहे तू डायरेक्ट घुसलासच… विशालचे म्हणणे आहे, त्यांची पाईप लाईन complete झाली गेम ते जिंकले… आणि वाद पुढे वाढतच गेला…

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालचा दिवस थोडा भावुक होता… जिथे काही खास पाहुणे सदस्यांना भेटायला घरामध्ये गेले. त्यांच्यासोबत रंगल्या गप्पागोष्टी, सदस्यांनी केली थोडी मज्जा मस्ती आणि झाला थोडा राडा… कारण अत्यंत महत्वपूर्ण असा टास्क त्यांच्यासमोर पार पडला आणि तो म्हणजे temptation रूममध्ये जाण्याची या सिझनमधील शेवटची सुवर्णसंधी कोणत्या सदस्याला मिळणार. मीरा आणि उत्कर्षने या टास्कमध्ये बाजी मारली आणि हा बहूमान त्यांना मिळणार असे वाटले आणि बिग बॉस यांनी जाहीर केले ही संधी एकाच सदस्याला मिळणार आहे. आणि त्यामुळे उत्कर्ष temptation रूममध्ये जाणार शेवटचा सदस्य ठरला. ज्याची किंमत मीराला चुकावावी लागली. आज घरामध्ये रंगणार आहे नवा टास्क.. बघूया यामध्ये कोण बाजी मारणार आणि कोण हारणार ?

TEAM A साठी कोण आहे threat ?

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सगळीच समीकरण बदलताना दिसतं आहेत. नक्की कोण कोणाच्या बाजूने खेळत आहे, कोण कोणाचा दुश्मन आहे ? कोणापासून threat आहे ? हे सांगण जरा अवघड होऊन बसलं आहे. प्रत्येकाला घरामध्ये टिकून राहायचे आहे आणि त्यामुळे प्रत्येक सदस्य त्याचा त्याचा गेम खेळतो आहे असं म्हणायला हरकत नाही. यामध्ये अगदी पहिल्या दिवसापासून मैत्रीच्या शपथा घेणारे सदस्य कुठवर ही मैत्री जपातील हे येणार्‍या दिवसांमध्ये कळणार आहेच. ग्रुपमध्ये देखील आता फुट पडण्यास सुरुवात झाली आहे. विकास – विशालनंतर आता कुठेतरी मीरा आणि गायत्रीमध्ये देखील दुरावा येत आहे असे दिसते आहे. मग काल मीराने उत्कर्ष, दादूस आणि जयसमोर तिचे मनमोकळे करणे असो वा मग त्यांची आजची चर्चा असो. आता आजची ही चर्चा नक्की गायत्रीवरुनचं आहे की मीरा आणि उत्कर्ष कोणा दूसर्‍या सदस्याबद्दल बोलत आहेत हे आजच्या भागामध्ये कळेलच.

उत्कर्ष आणि मीरा आज चर्चा करताना दिसणार आहेत. उत्कर्ष म्हणाला, मला म्हणे उत्कर्ष तरीपण तू खेळलास ना… मी म्हणालो, अगं मी खेळलोच नाही… its an accident. तुला पकडायचं असतं तर मग मी कसंही पकडलं असतं. माझेच मित्र मला सांगत होते खेळ पण तरीदेखील मी खेळलो नाही… जयने मला उदाहरण दिलं मस्त, बाहेरून कोणी आग लावायला आलं तर आपण बाहेर पहारा देऊ शकतो, वाचवू शकतो. घरातच कोणी गॅस लावला तर ? विश्वासघात म्हणतात त्याला… मला त्याने तेव्हाच सांगितलं होतं की, ही तुम्हांला सगळ्यांना threat होईल.” मीराचे म्हणणे आहे, विश्वासघात नाही तिला insecurity आहे… आणि चर्चा पुढे सुरू राहिली… पुढे या दोघांमध्ये अजून काय काय चर्चा झाली ?

घरामध्ये रंगणार “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य !

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज सोनाली आणि विकासमध्ये बाचाबाची होणार आहे. आज घरामध्ये रंगणार आहे “ही पाइपलाईन तुटायची नाय” हे साप्ताहिक कार्य ! आणि याच कार्या दरम्यान सोनाली आणि विकासचे भांडण होणार आहे. सोनालीला असं वाटतं आहे विकास तिच्यासाठी खेळला नाही. नक्की काय झालं ? यावर विकास त्याची बाजू मांडताना दिसणार आहे. पण, सोनाली विकासचं काहीच ऐकून घ्यायला तयार नाहीये असं दिसून येतं आहे. सोनाली विकासवर आरोप करताना दिसणार आहे. विकासने जी गोष्ट टास्कमध्ये केली नाही वा तो करू शकला नाही त्याचे काही कारण आहे जे तो सोनाली आणि विशाल सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. विकास त्याचा पॉइंट पटवून देऊ शकेल ? कळेलच आजच्या भागामध्ये.

सोनालिचे म्हणणे आहे, ऐक मी तुला सांगते तुझ्याठिकाणी दूसरा कोणीतरी असता तर तू जे आज केले आहेस ते तू केलं नसंतस … विकासचं म्हणण आहे, कारण मला इथे मारामारी, पाडापाडी नाही करायची… मी जे पाहिले ना… टेबलवर त्याचं डोकं आपटल असतं… सोनाली म्हणाली, आता त्यांची इच्छा आहे ना तू बसल्यावरती खेळायचं, आता आम्ही तुझ्यासाठी खेळणार. तू माझ्यासाठी नाही खेळलास ना, पण मी तुझ्यासाठी खेळणार. विकासचे म्हणणे आहे, मला emotional blackmail करू नकोस. तुझ्यासाठी डोकी फोडून घ्यायची अशी तुझी इच्छा आहे का ? मारामारी करायची होती का ? काय करायचं होतं ? सोनाली म्हणाली, तुझा गेम माहिती नाही का मला ? विशाल म्हणाला, मारामारी कोणीच नव्हतं करत. विकास म्हणाला, सोनाली मला म्हणते तू काही खेळलास नाही… म्हणजे मी मारामारी केली असती तर खेळलो असं होतं का ? सोनाली म्हणाली, तुला उमेदवारी पाहिजे ना ? मग देऊ तुला उमेदवारी… आणि हा वाद असाच सुरू राहिला… बघूया हा वाद कुठवर गेला ते आजच्या भागामध्ये.

बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा.कलर्स मराठीव

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.