आजचे राशिभविष्य शनिवार,७ सप्टेंबर २०२४

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
भाद्रपद शुक्ल चतुर्थी. क्रोधीनाम संवत्सर.   
राहुकाळ – सकाळी ९.०० ते सकाळी १०.३०
“आज आनंदी दिवस आहे” *गणेश चतुर्थी* पार्थिव गणेश पूजन. चंद्रदर्शन निषेध.   
नक्षत्र: चित्रा/ (दुपारी १२.३४ नंतर) स्वाती. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी- तुळ.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल दिवस आहे. तुमची कीर्ती दिगंत पसरेल. कोर्ट कामात यश मिळेल. नात्यातून लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) षष्ठ स्थानी चंद्र आहे. काही सुखद घटना घडतील. आर्थिक लाभ उत्तम होतील. व्यवसाय वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) उत्तम दिवस आहे. स्वप्ने साकार होतील. आर्थिक तरतूद होईल. लॉटरी मधून लाभ मिळतील.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उद्योग/व्यवसायात भरघोस वाढ होईल. प्रगतीची नवी दालने खुली होतील. जमीन व्यवहारात उत्तम यश मिळेल.

सिंह:– (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) तृतीय स्थानी चंद्र आहे. भरघोस आर्थिक लाभ होतील. अधिकार वाढतील. अनुकूल मंगळ तुमचा दबदबा वाढवेन.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अत्यंत चांगले अनुभव येतील. कामात प्रगती होईल. अडथळे दूर होतील. पैशांची तजवीज होईल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते)  तुमच्याच राशीत चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. कामाचा ताण कमी होईल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) संमिश्र दिवस आहे. अपघाताचे भय आहे. जोडीदाराचा गैरसमज होऊ शकतो.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) अनुकूल दिवस आहे. कायदेशीर कामात मनासारखे मार्ग निघतील. पारिवारिक कामाला प्राधान्य द्याल. शत्रू पराभूत होतील.

मकर:– (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) व्यावसायिक वाढ होईल. कामाचा ताण वाढेल. मात्र नफा देखील वाढणार आहे. आरोग्य सांभाळा.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) आर्थिक उलाढाल वाढेल. नवीन संधी प्राप्त होतील. धार्मिक कामातून यश मिळेल. पराक्रम गाजवाल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) संमिश्र दिवस आहे. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नवीन ओळखी होतील. मान सन्मान मिळतील.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.