आजचे राशिभविष्य मंगळवार,४ जून २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
वैशाख त्रयोदशी. ग्रीष्म ऋतू. 
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३० 
“आज वर्ज्य दिवस आहे” *भौमप्रदोष, शिवरात्री* 
नक्षत्र – भरणी. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी – मेष.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अनुकूल शनिशी चंद्राचा लाभ योग् आहे. महत्वाची कामे आज पार पडतील. कलाकारांना यश मिळेल.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) तुमच्या राशीत बुध – गुरू युती आहे. भाग्योदय होईल. अनपेक्षित लाभ होतील. आत्मविश्वास वाढेल.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) अनुकूल दिवस आहे. योग्य कारणासाठी खर्च होईल. संधी मिळतील. प्रगती होईल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) उत्तम ग्रहमान आहे. सन्मान होतील. कीर्ती पसरेल. वाहन सुख मिळेल. महिलांना दागिने मिळतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) धार्मिक यात्रा घडेल. जेष्ठ व्यक्तीचा सन्मान करा. पित्याकडून लाभ होतील. शक्ती वाढेल.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अजूनही फारशी अनुकूलता नाही. संयमाने कामे करावीत. फार धावपळ करू नये. पत्नीची काळजी घ्यावी.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) हरवलेली वस्तू सापडेल. नवीन नाती जुळतील. मात्र सावधपणा आवश्यक आहे. जोडीदाराची काळजी घ्या.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) मन प्रसन्न राहील. उत्तम ग्रहमान आहे. व्यवसाय वाढेल. नोकरीत चांगल्या घटना घडतील. प्रेमात यश मिळेल.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) मौल्यवान खरेदी होईल. महिलांना भेटवस्तू मिळतील. वारसा हक्काचे प्रश्न सुटतील. आरोग्य सुधारेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) पंचम स्थानी शुभ ग्रहांची मांदियाळी आहे. आत्मविश्वास वाढेल. संतती बाबत शुभ समाचार समजतील. प्रेमात यश मिळेल. अचानक लाभ होतील.

कुंभ:– (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) स्व राशीतील शनिशी चंद्राचा शुभ योग आहे. आर्थिक बाजू भक्कम राहील. वास्तू संबंधित प्रश्न सुटतील. सरकारी कामात यश मिळेल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) अनुकूल दिवस आहे. नात्यातून लाभ होतील. कुटुंबात तुमचे वजन वाढेल. कीर्ती पसरेल.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.