सेन्सेक्स ५८६अंकांनी घसरला

0
विश्वनाथ बोदडे, नाशिक
जागतिक शेअर बाजाराच्या संकेत यांच्या आधारे आज भारतीय शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात चढ-उतार बघायला मिळालेत.सकाळी सिंगापुर निफ्टी साधारणपणे 200 अंकांनी नकारात्मक होते त्यामुळे भारतीय शेअर बाजार उघडला तेव्हा सेन्सेक्स 500 पेक्षा जास्त लोकांनी खाली घसरला होता ,ही घसरण शेवटपर्यंत कायम राहिली कारण आज जास्तीत जास्त क्षेत्रांच्या समभागांमध्ये विक्री बघायला  दिसली, त्याचाच परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा तीस समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 586 अंकांनी घसरून 52553  या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 171 अंकांनी घसरून15752  या पातळीवर स्थिरावला तर 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला बँक निफ्टी 672 अंकांनी घसरून 35079 या  पातळीवर बंद झाला.

आजच्या बाजारामध्ये खरे हिरो ठरले ते म्हणजे आज नव्याने सूचीबद्ध म्हणजेच लिस्टिंग झालेले दोन समभाग यांनी गुंतवणूकदारांना जवळपास डबल परतावा दिलेला आहे.क्लीन सायन्स या कंपनीने आय पी ओ च्या माध्यमातून नवीन भागधारकांना समभाग देऊन भाग भांडवल जमा करण्यासाठी एक इतिहास नोंदवला आहे, जवळपास एक लाख करोड जमा केले होते त्यांनी प्रति शेअर्स 900 रुपये अशी ऑफर दिली होती त्याचे आज लिस्टिंग झाली ती 1770 रुपये मध्ये तर जीआर इन्फ्रा या कंपनीने 837 रुपयांमध्ये सहभाग दिला होता त्याची लिस्टिंग सतराशे अठरा या दराने आज झाली.

भारतीय शेअर बाजारात आज प्रामुख्याने बँकिंग आणि फायनान्स या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळाली यामध्ये एकच शेअर्स आघाडीवर होते त्याच बरोबर स्मॉलकॅप मिडकॅप यामध्ये सुद्धा वरच्या स्तरावर विक्री बघायला मिळत होती.

बाजारातील जाणकार सांगत आहेत की सध्या बाजार उंच स्थरावर असल्यामुळे नफा वसुली सहाजिकच येऊ शकते परंतु त्याच बरोबर काही विशिष्ट क्षेत्रांच्या समभागांना मागणीसुद्धा दिसेल त्याच बरोबर संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू झालेले आहे यामध्ये कोणते बिल पास होतात त्या क्षेत्राच्या शेअर्समध्ये आपल्याला मागणी मिळू शकतेकमोडिटी बाजारामध्ये आज क्रूड ऑइल चे भाव घसरलेले दिसले तर सोने आणि चांदी यामध्ये काही प्रमाणात घसरण बघायला मिळाली.

NIFTY १५७५२ – १७१
SENSEX ५२५५३ – ५८६
BANK NIFTY ३५०७९ – ६७२
आज निफ्टी वधारलेला शेअर्स 
NTPC १२१.५० + २%
BPCL ४५५ + २%
DIVIS LAB ४८०५ + १%
NESTLEIND १७७६० + १%
TATACONSUM ७६६ + १%
आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
HDFC BANK १४७२ – ३%
INDUSINDBK १०१५ – ३%
HDFC LIFE ६७९ – ३%
AXIS BANK ७५४ – २%
HDFC २४८३ – २%
यु एस डी  आय एन आर $ ७५.०२२५
सोने १० ग्रॅम         ४७८३०.००
चांदी १ किलो       ६७६५०.००
क्रूड ऑईल           ५१६६.००
Vishwanatha Bodade
विश्वनाथ बोदडे, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.