सेन्सेक्स ४९० अंकांनी वधारला 

विश्वनाथ बोदडे,नाशिक

0

विश्वनाथ बोदडे,नाशिक

8888280555

भारतीय शेअर बाजारात सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील व विदेशी वित्तीय संस्था यांच्या घडामोडीवर आपले चढ-उतार दाखवताना दिसत आहेत, आजचे चित्र सुद्धा असेच होते सकाळी आंतरराष्ट्रीय संकेताच्या आधारे भारतीय शेअर बाजार  साधारणपणे 500 अंकांनी सकारात्मक उघडला व ही उंची 1000 अंकांच्या आसपास गेली होती परंतु वरच्या स्तरावर नफा वसुली आज सुद्धा बघायला मिळाली कारण मागील दोन दिवसांमध्ये सेन्सेक्समध्ये जवळपास 2000 अंकांची घसरण आपणास बघायला मिळाली होती.

आज मुंबई शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 490 अंकांनी वधारून 57 319 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी सुद्धा 156 अंकांनी वधारून 16 771 या पातळीवर बंद झाला त्याचबरोबर बारा बँकिंग समभागांचा निर्देशांक निफ्टी बँक 168 अंकांनी वधारून 34 608 या पातळीवर बंद झाला.

सध्या बाजार खाली येण्यासाठी फक्त कारण शोधत आहे असे संकेत मागील काही दिवसापासून बघायला मिळत आहेत याला मुख्य कारण म्हणजे विदेशी वित्तीय संस्था मागील काही दिवसांपासून सातत्याने त्यांच्या पोर्टफोलिओ मधील समभाग विक्री करून नफा वसुली करताना दिसत आहेत त्याच बरोबर नेहमीप्रमाणे दरवर्षी डिसेंबर महिन्यामध्ये विदेशी वित्तीय संस्था शेवटच्या आठवड्यामध्ये सुट्टीवर जात असतात त्यामुळे आता बाजाराला देशातील काही राज्यांमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका आणि केंद्रीय अर्थसंकल्प यामध्ये का येते यावर सुद्धा बाजाराची दिशा अवलंबून असू शकते.

परंतु काही कंपन्यांचे तिमाही निकाल चांगले येण्याची अपेक्षा सुद्धा बाजारातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत, त्याचबरोबर बाजारामध्ये फंडाच्या मार्फत चांगल्या प्रमाणे गुंतवणूक येत आहे याचा अर्थ असा होऊ शकतो की बाजार जरी काही दिवसांसाठी खाली आला तर ती संधी समजावी व लांब अवधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करत राहावे.

NIFTY १६७७१ + १५६
SENSEX ५७३१९ + ४९७
BANK NIFTY ३४६०८ + १६८ 

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

HCLTECH १२१० + ४%
WIPRO ६९१ + ४%
UPL ७३४ + ४%
TATA STEEL ११०९ + ३%
ADANIPORTS ७२५ + ३%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्सचे भाव

POWERGRID २०६ – २%
AXIS BANK ६६७ – १%
BAJFINANCE ६५८७ – १%
TATACONSUM ७०५ – १%
CIPLA ८८९ – १%

यु एस डी  आई एन आर $ ७५.६१८५
सोने १० ग्रॅम       ४८०८५.००
चांदी १ किलो      ६२३२०.००
क्रूड ऑईल        ५२९४.००

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.