शनिशास्त्र : येणाऱ्या साडेसातीत मीन राशीच्या लोकांनी कोणती काळजी घ्यावी 

हरिअनंत,नाशिक 

0

हरिअनंत,नाशिक 

मीन राशीचा गुरू अतिशय उत्तम असेल तर साडेसातीत मीन राशींच्या व्यक्तीला साडेसातीचा त्रास जाणवत नाही. मीन राशीच्या जन्मपत्रिकेत गुरू  बिघडलेला असेल  आणि त्यात बिघडलेल्या गुरू असून व्यक्ती चुकीचे कामे करीत असेल, तर साडेसातीत मीन राशीच्या व्यक्तीला एवढा त्रास होतो की तो सहन ही होत नाही. त्रास होण्यापूर्वी मीन राशीचा गुरू बिघडलेल्या व्यक्तीने  आपले स्वतःचे आत्मपरीक्षण करून गुरुची, वडीलधाऱ्या व्यक्तींची गाईची सेवा करावी. काही चुकीचे काम करीत असाल तर ते त्वरित बंद करावे..

ते कामे अन्यायकारक असेल आणि आजपर्यंत ते कामे अंधारात असतील तर त्या कामावर साडेसातीत शनी प्रकाश पाडून चुकीच्या कामाचा शनी समाजच्यापुढे आणून पर्दाफाश केल्या शिवाय व्यक्तीला सोडीत नाही. हे निश्चित लक्षात ठेवावे.  मीन राशीला साडेसाती लागणार आहे ती लागण्यापूर्वी मीन राशिंच्या व्यक्तीवर जणू ही गुरू,शनीने केलेली कृपाच आहे. या कृपेचा लाभ घेऊन मीन राशींच्या जन्मपत्रिकेत गुरू बिघडलेला असेल त्यांनी वेळीच सतर्क व्हावे.

मागिल भागापासून पुढे

गुरुशी संबंधित शनी मीन राशीत असल्यास सांपात्तिक स्थिती जन्मतः चांगली असते, नसल्यास करून घेतात एक अतिशय महत्वाचा योग होतो. ह्या रषोतील शनीचे सहसा कोणाशीही पटत नाही. जीवनात आत्यंतिक प्रतिकूल वातावरण निर्माण करण्याकडे ह्या शनीचा कल असतो. विवाहसुखाच्या दृष्टीने(शुक्र बिघडलेला असल्यास) ह्या शनीची फळे चांगली मिळत नाहीत क्वचित प्रसंगी द्विभार्यायोग होतो. खूप दिवस  विधुरावस्थेत राहण्याकडे ह्या व्यक्तींचा कल असतो.

थंडी व दमा ह्यासारखे रोग उत्पन्न करतो. पूर्वभाद्रपदा नक्षत्री कायद्याचा अभ्यास, कोर्टातील नोकरी, खाजगी चिटणीसाची नोकरी, सल्लागार, कस्टम व हॉस्पिटलमधील नोकरी वगैरशी संबंध दाखवितो. उत्तरभाद्रपदा नक्षत्री उपासना व योगशास्त्र अभ्यासास उत्तम असतो. गुरू उत्तम असेल तर सांपात्तिक स्थिती  उत्तम ठेवतो. या व्यक्ती काही अंशी परावलंबी असतात. धार्मिक ग्रंथाचे वाचन करतात. वरील फळे विशेषतः मीन राशीतील शनी लग्नी, पंचमात, सप्तमात व दशमात असता मिळतात. रेवती नक्षत्री मीन राशीत शनी असल्यास विश्वस्त म्हणून काम पाहण्याचा योग्य संभवतो.धर्म संस्थांशी व देवालयांशी संबंध ठेवतो. कायद्याचा आणि धर्मशास्त्राच्या अभ्यास उत्तम.. शनी  सांपात्तिक उत्कर्ष करतो पण जन्मपत्रिकेतील गुरू बिघडलेला असेल,तर (क्रमशः) भाग -१४७

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

शुभम भवतु …

मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव   सावधानता, आजार, व्यवसाय,  आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.