आजचे राशिभविष्य शुक्रवार, १७  डिसेंबर २०२१

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
मार्गशीर्ष शुक्ल चतुर्दशी, हेमंत ऋतू, दक्षिणायन, प्लवनाम संवत्सर.
राहू काळ – सकाळी १०.३० ते दुपारी १२.००
आज सामान्य दिवस, यमघंट सकाळी १०.४० नंतर.
चंद्र नक्षत्र – कृतिका  (सकाळी १०.४० पर्यंत)
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)  
 
मेष:- प्रतिष्ठा सांभाळा. वादविवादाचे प्रसंग येतील. उपासना लाभदायक ठरेल.     
     
वृषभ:- पूर्ण होत आलेले काम बिघडू शकते. संयम ठेवा. अडचणी दूर होणास काही काळ जावा लागेल. 
 
मिथुन:-  खर्चात वाढ होईल. विनाकारण कटकट होईल. अनुकूलता नाही.  
 
कर्क:- उत्तम दिवस आहे. सौख्य लाभेल. लाभ होतील. आनंदी राहाल. 
 
सिंह:- कामानिमित्त दूर जावे लागेल. मनःशांती ढळू शकते. प्रवासात त्रास होईल. उपासना करा. 
  
कन्या:- संमिश्र दिवस आहे. फारसे अनुकूल वातावरण नाही. घाई नको. 
 
तुळ:- महत्वाची कामे आज नकोत. विश्रांतीची गरज भासेल. आरोग्याची काळजी घ्या. 
 
वृश्चिक:- प्रगती होईल. विजयी व्हाल. शत्रू पराभूत होतील. प्रेमात घाई नको.
 
धनु:- धनलाभ होईल. मार्ग सापडेल. नवनवीन कल्पना सुचतील. प्रगतीचा वेग मात्र कमी राहील.  
 
मकर:- आज अनुकूलता नाही. प्रतिष्ठा पणाला लागेल. संयम बाळगा.
 
कुंभ:- मानसिक कुचंबणा होऊ शकते. सहनशक्तीची परीक्षा होईल. ध्यानधारण करा.   
 
मीन:- अधिकारावर आक्रमण होऊ शकते. कठोर बोलणे टाळा. मोठे निर्णय नकोत. 
Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी –  8087520521)

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.