गुरुवारी नाशिक शहरात “या” विभागातील पाणीपुरवठा बंद 

0

नाशिक – नाशिक महानगर क्षेत्रातील गांधी नगर जलशुध्दीकरण केंद्र येथुन नाशिकरोड विभागाला रॉ वॉटर पुरवठा करणारी ८०० मी.मी. पी.एस.सी. पाईपलाईनची  उपनगर नाका येथे तसेच आम्रपाली झोपडपटटी कॅनल रोड, नाशिकरोड येथे मोठयाप्रमाणावर गळती सुरु झालेली असल्यामुळे दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेणे आवश्यक आहे.

त्यामुळे नाशिकरोड विभागातील काही क्षेत्रात  गुरुवार दिनांक २७ जानेवारी २०२२ रोजीचा दुपार सत्र व सांयकाळचा तसेच  शुक्रवार दिनांक  २८ जानेवारी २०२२ रोजीचा सकाळचा पाणी पुरवठा होणार नाही, शुक्रवार दिनांक  दिनांक  २८ जानेवारी २०२२ रोजीचा दुपारनंतरचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल, तरी याची नागरीकांनी नोंद घ्यावी असे आवाहन नाशिक महानगर पालिके तर्फे करण्यात आले आहे.

कोण कोणत्या भागात पाणी पुरवठा होणार नाही 

प्रभाग क्र 17- कॅनोल रोड परीसर, नारायण बापू नगर, चंपानगरी, गोदावरी सोसा.,दसकगाव, शिवाजी नगर, एम.एस.सी.बी कॉलनी, तिरुपती नगर, टाकळी रोड परिसर, भिमनगर परिसर,

प्रभाग क्र.18- शिवाजी नगर,मॉडेल कॉलनी, अयोध्या कॉलनी, पवारवाडी , इंगळे चौक, पंचक गांव सायखेडा रोड, भगवा चौक, शिवशक्ती नगर.

प्रभाग क्र.19- गोरीवाडी, चेहडी परीसर, नाशिक पुना हायवे, एकलहरा रोड, सामनगाव, चाडेगांव पंपीग परिसर

प्रभाग क्र.20– पुनारोड परीसर, राम नगर, विजय नगर, शाहु नगर, लोकमान्य नगर, मोटवाणी रोड, कला नगर, आशा नगर, जिजामाता नगर,

प्रभाग क्र.21- (भागश: ) जयभवानी रोड परीसर, सहाणे मळा, लवटे नगर 1 व 2, आर्टीलरी सेंटर रोड, दत्तमंदीर रोड, धोंगडे नगर, जगताप मळा, तरण तलाव परीसर, चव्हाण मळा, फर्नाडिस वाडी, भालेराव मळा, जाचक नगर, नंदनवन कॉलनी, आवटे नगर, गोसावी वाडी, राजेंद्र कॉलनी, आनंद नगर, आडके नगर

प्रभाग क्र.22-  रोकडोबावाडी,  डोबी मळा, सुंदर नगर, डावखर वाडी, जयभवानी रोड परीसर, अश्विनी कॉलनी, जेतवन नगर, बिटको कॉलेज तरणतलाव.सौभाग्य नगर, बागुल नगर, देवळाली गांव, मालधक्का रोड, गाडेकर मळा, एम.जी रोड, गिते मळा, खर्जुल मळा, विहीत गांव

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.