सुप्रसिद्ध अभिनेता सचित पाटीलचं टेलिव्हिजनवर धमाकेदार पुनरागमन

0

मुंबई – येत्या २3 नोव्हेंबरपासून स्टार प्रवाहवर सुरु होतेय नवी मालिका अबोली. या मालिकेत सचित पाटील इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सचितला याआधी ग्लॅमरस रुपात आपण पाहिलं आहे. त्यामुळे अबोली मालिकेतला त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.

या भूमिकेविषयी सांगताना सचित म्हणाला, ‘मी खूपच एक्सायटेड आहे. स्टार प्रवाह सारख्या नंबर वन वाहिनी सोबत काम करताना खूपच आनंद होतोय. मी पहिल्यांदाच स्टार प्रवाहसोबत काम करतोय. मी स्टार प्रवाहचा खूप मोठा चाहता आहे. मी सगळ्या मालिका आवर्जून पहातो. लिखाणाच्या दर्जापासून कलाकारांचा अभिनय आणि दिग्दर्शन या सर्व गोष्टी मला भावतात. त्यामुळे खूप दिवसांपासून या कुटुंबाचा भाग होण्याची इच्छा होती. अबोली मालिकेच्या निमित्ताने हा योग जुळून आलाय. या मालिकेत मी इन्सपेक्टर अंकुश ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. मी माझ्या करिअरच्या पहिल्या सिनेमात पोलिस इन्सपेक्टरची भूमिका साकारली होती. त्यानंतर आता अबोली मालिकेत मी पुन्हा खाकी वर्दी परिधान करणार आहे. मालिकेचा विषयही खूप छान आहे. अबोली नावाच्या मुलीच्या संघर्षाची ही गोष्ट आहे. छोट्या पडद्यामुळे तुम्ही दररोज प्रेक्षकांच्या घरात पोहोचता त्यांच्या कुटुंबाचा भाग होता. अबोली मालिकेच्या निमित्ताने माझी प्रेक्षकांशी नेहमी भेट होईल त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.’

तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका अबोली सोमवार ते शनिवार रात्री १०.३० वाजता स्टार प्रवाहवर रसिकांच्या भेटीला येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.