शेअर बाजाराचा पुढील आठवडा कसा असेल !

0

विश्वनाथ बोदडे

बाजाराचा पुढील आठवडा कसा असेल हे वेळोवेळी येणारी परिस्थिती ठरवणार असली तरी सरकारच्या माध्यमातून जे काही बदल करण्यात येत आहे त्यामुळे त्या क्षेत्रांच्या समभागांमध्ये आपल्याला मागणी बघायला मिळू शकते जसे च्या माध्यमातून बँकांनी काही शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे त्याचबरोबर सुट्टीच्या दिवसात सुद्धा आपल्या खात्यामध्ये आपले वेतन अथवा रक्कम क्रेडिट केली जाऊ शकते याचा अर्थ असा की मनुष्यबळाचा कमी वापर करून डिजिटल म्हणजेच ऑनलाइनच्या सुविधा वापरून बँकिंग क्षेत्रामध्ये नवीन रेफॉर्मस आणले जाऊ शकतात आणि त्याचा फायदा बँकांचा खर्च कमी होऊन इन्कम वाढीवर होऊ शकतो.
 
 
मागील संपूर्ण आठवड्यात शेअर बाजारामध्ये जी चढ-उतार आपल्याला बघायला मिळाली त्याला मुख्य कारण म्हणजे जागतिक स्तरावरील आर्थिक घडामोडी होत्या,  मागील आठवड्यात आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रामुख्याने चीन ह्या देशातील आर्थिक घडामोडींचा त्या देशातील शेअर बाजारावर त्याच बरोबर हाँगकाँग, अमेरीका, सिंगापूर तसेच एशियन बाजारात दिसला अणि त्यांचे पडसात भारतीय शेअर बाजारात सुद्धा आपण अनुभवले.
 
मागच्या आठवड्यात भारतीय शेअर बाजार पाच दिवसांपैकी चार दिवस नकारात्मक बंद झाला होता तर एक दिवस आपल्याला सकारात्मक दिसला यामध्ये सेन्सेक्स 388 अंकांनी निफ्टी अंकांनी आणि बँक निफ्टी 450 अंकांनी घसरलेले आपण बघितले.
 
DATE     NF  SENSEX  BNF
26.07     -31    -123        -85
27.07     – 78   -273      -182
28.07     -37   – 135     – 264
29.07     +69  +209    +158
30.07     – 15  – 66       – 127
 
मागच्या आठवड्यात बाजारातील दिग्गज कंपन्यांचे तिमाही निकाल सुद्धा आले त्यामुळे काही प्रमाणात बाजारामध्ये चढ-उतार दिसले परंतु बँकिंग , फायनान्स व फार्मा क्षेत्रांच्या समभागांमध्ये एक प्रकारे नफा वसुली दिसली तर दुसरीकडे स्टील सिमेंट आयटी आणि चांगल्या प्रतीच्या मीट कॅप समभागांमध्ये मागणीसुद्धा बघायला मिळाली.
आपण आतापर्यंत बघितले आहे की बाजारामध्ये जेव्हा जेव्हा मोठे आयपीओ येतात त्यावेळेस काही प्रमाणात बाजारामधून पैसा बाहेर जाऊन आयपीएल मध्ये गुंतवणूक होताना दिसलेली आहे त्याचाच परिणाम मागील आठवड्यामध्ये सुद्धा बघायला मिळाला.
 
आयपीओ गुंतवणूकदारांना आकर्षित करत आहेत.
 
सध्या बाजारामध्ये सतत आयपीओ म्हणजेच नवीन कंपन्या आपल्या कंपनीसाठी गुंतवणूकदारांकडून भाग भांडवल जमा करण्यासाठी बाजारामध्ये आय पी ओ लाँच करताना दिसत आहेत आणि गुंतवणूकदार सुद्धा त्याला चांगला प्रतिसाद देत आहेत त्याचे कारण म्हणजे मागील काही दिवसांपासून जे आयपीओ बाजारात सूचीबद्ध म्हणजेच लिस्टिंग झालेत त्यांनी गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात परतावा दिला आहे.
 
भारतीय शेअर बाजार सध्या जरी उंच स्थरावर असला तरी विविध क्षेत्रांच्या  समभागांमध्ये मागणी वाढत असताना दिसत आहे याला मुख्य कारण म्हणजे संपूर्ण देशात सुरू असलेला मान्सून त्याच बरोबर लसीकरण आणि ज्या राज्यांमध्ये काही प्रमाणात लॉक डाऊन च्या तासांमध्ये शिथिलता देण्यात येत आहेत आणि जे क्षेत्र बंद आहे त्यांना अटी आणि नियम लावून राज्य सरकार परवानगी देत आहेत त्यामुळे भविष्यकाळात जे क्षेत्र बंद आहेत त्या क्षेत्रांना त्यांचे उत्पन्न सुरू होईल या आशेने ज्या कंपन्या सूचीबद्ध आहेत त्यांच्या सर्व भागांमध्ये आपल्याला खरेदी येताना बघायला मिळत आहे जसे विमानसेवा पर्यटन मनोरंजन हॉटेल्स इत्यादी.
 
कमोडिटी बाजारांमध्ये मागील आठवडा स्थिर होता असे म्हणावे लागेल कारण कच्च्या तेलाच्या किमती त्याचबरोबर सोने आणि चांदी यांचे दर खाली आले असले तरी एका स्थिर अवस्थेत बंद झालेले आपल्याला बघायला मिळाले आहेत मेटल क्षेत्रामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी वाढल्यामुळे कॉपर, निकेल, लीड यांच्या किमती आपल्याला वधारलेल्या बघायला मिळाल्यात, बाजाराचे जाणकार सांगत आहेत की चीनमध्ये ज्या घडामोडी सुरू आहेत त्याचा परिणाम या क्षेत्रांवर दिसून येत आहेत.
 
संपर्क – 8888280555

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.