भोंदूबाबा कांडात मोठा बॉम्ब! डीएनए टेस्टपासून व्हिडिओपर्यंत धक्कादायक खुलासे
रुपाली ठोंबरेंचा थेट आरोप; “माजी महिला आयोग अध्यक्षांना तातडीने अटक करा”:महाराष्ट्र हादरवणारे दावे”

नाशिक | २७ मार्च २०२६- Ashok Kharat case update नाशिकमधील गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाने आता आणखी धक्कादायक वळण घेतले असून, सामाजिक कार्यकर्त्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत राज्यात मोठी खळबळ उडवली आहे. या प्रकरणात अश्लील व्हिडिओ, डीएनए टेस्ट आणि कथित रॅकेट यांसारख्या मुद्द्यांवर त्यांनी थेट माजी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्यावर निशाणा साधला आहे.
रुपाली ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “जे अश्लील व्हिडिओ बाहेर आले आहेत, त्याबाबत आधीच राज्य महिला आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या होत्या. मात्र हे व्हिडिओ पोलिसांकडे उशिरा पोहोचले. दरम्यान, हे व्हिडिओ विविध माध्यमांतून आणि पेन ड्राइव्हद्वारे मोठ्या प्रमाणावर पसरवले गेले.”
त्यांनी पुढे सांगितले की, “अशोक खरात (Ashok Kharat case update) विरोधात दाखल झालेला गुन्हा नाशिक शहर पोलिसांकडे असून तो आता एसआयटीकडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणात माजी महिला आयोग अध्यक्षांनी दबाव टाकून काही गुन्हे दाखल करवून घेतल्याचा संशय आहे.”
ठोंबरे यांनी अत्यंत गंभीर आरोप करत म्हटले की, “पीडित महिलांना समुपदेशनाच्या नावाखाली भोंदूबाबाकडे पाठवले जात होते. ‘तुमच्या पत्रिकेतील ग्रह बघा’ असे सांगून त्यांना त्या ठिकाणी नेले जात होते. ही अत्यंत धक्कादायक बाब आहे.”यासोबतच त्यांनी थेट मागणी करत म्हटले, “रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे. पुण्यात आलेल्या काही प्रकरणांमध्ये आर्थिक देवाण-घेवाण झाली का? हे तपासात समोर येणं गरजेचं आहे.”
दरम्यान, या प्रकरणामुळे अनेक कुटुंबांमध्ये तणाव निर्माण झाल्याचेही त्यांनी सांगितले. “ज्या महिलांना मूल होत नव्हतं, त्या भोंदूबाबाकडे गेल्या. आता त्यांना मूल झालं आहे. पण या प्रकरणानंतर त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाले असून अनेक ठिकाणी डीएनए टेस्ट केल्या जात आहेत,” असा धक्कादायक दावा त्यांनी केला.तसेच, “दररोज महिलांचे व्हिडिओ बाहेर येत आहेत, पण संबंधित अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील व्हिडिओ का समोर येत नाहीत? याचाही तपास व्हायला हवा,” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
या संपूर्ण प्रकरणात भोंदूबाबा अशोक खरात आणि संबंधित अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप करत, “अनेक कुटुंबे उद्ध्वस्त होत आहेत. या सर्वासाठी जबाबदार कोण?” असा थेट प्रश्न ठोंबरे यांनी उपस्थित केला.सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत सुरू असून, येत्या काही दिवसांत आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रभर या प्रकरणामुळे संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

