आजचे राशिभविष्य मंगळवार,२ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Marathi Rashi Bhavishya)
अधिक ज्येष्ठ कृष्ण द्वितीया / संध्याकाळी ७.०२ नंतर तृतीया.
ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – दुपारी ३.०० ते दुपारी ४.३०
“आज चांगला दिवस आहे.”
चंद्रनक्षत्र – मूळ / रात्री १०.०६ नंतर पूर्वाषाढा.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – धनु.
रवी लाभ शनी.  
चंद्र त्रिकोण मंगळ.  
चंद्र प्रतियुती बुध.  
चंद्र केंद्र नेपच्यून.

राशिभविष्य (Marathi Rashi Bhavishya)

मेष:- (चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) भाग्याची उत्तम साथ लाभेल. नवीन कामे उत्साहाने पूर्ण कराल. चंद्र-मंगळाच्या शुभ योगामुळे धाडसी निर्णय यशस्वी ठरतील. मित्र आणि सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ संभवतात.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) आर्थिक व्यवहारात सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतो. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. वरिष्ठांच्या सल्ल्याने कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं,छा,के,को,हा) चंद्र-बुध प्रतियुतीमुळे विचारांमध्ये द्विधा मनःस्थिती निर्माण होऊ शकते. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या. लेखन, शिक्षण आणि संवाद क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होतील. नवीन ओळखी उपयोगी पडतील.

कर्क:- (हु,हे,हो,डा,डी,डु,डे,डो) उद्योग-व्यवसायात प्रगती होईल. नोकरीत जबाबदाऱ्या वाढतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभाचे योग आहेत. महिलांकडून सहकार्य लाभेल.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा,टी,टू,टे) भाग्योदयाचे संकेत मिळतील. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवासातून लाभ संभवतो. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल.

कन्या:- (टो,पा,पी,पू,षा,णा,ठा,पे,पो) अष्टमस्थानी ग्रहप्रभावामुळे आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. गुप्त शत्रूंवर विजय मिळवाल. संशोधन, तांत्रिक आणि गूढ विषयांमध्ये यश मिळेल. आर्थिक व्यवहार जपून करा.

तुळ:- (रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) वैवाहिक आणि भागीदारीच्या संबंधात सकारात्मक घडामोडी होतील. काही गैरसमज दूर होतील. नवीन करार आणि व्यवहार लाभदायक ठरतील. प्रिय व्यक्तीसोबत आनंददायी वेळ जाईल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू,ने,नो,या,यी,यु) कामाचा ताण वाढेल, पण त्यातून यश मिळेल. विरोधकांवर मात कराल. नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न कराल. आर्थिक स्थिती स्थिर राहील.

धनु:- (ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. मन प्रसन्न राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे. कला, शिक्षण आणि अध्यात्म क्षेत्रात विशेष यश मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी,खु,खे,खो,गा,गी) खर्च वाढण्याची शक्यता आहे. परदेश किंवा दूरच्या ठिकाणांशी संबंधित कामात प्रगती होईल. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. संयमाने वागल्यास लाभ मिळतील.

कुंभ:- (गु,गे,गो,सा,सी,सु,से,सो,दा) लाभस्थानी ग्रहयोग असल्याने आर्थिक आवक वाढेल. मित्रमंडळींचे सहकार्य मिळेल. नवीन योजना यशस्वी होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मीन:- (दी,दू,झा,ज्ञा,था,दे,दो,चा,ची) व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांकडून कौतुक होईल. कुटुंबातील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडाल. आर्थिक लाभ आणि मान-सन्मान वाढेल.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!