आधुनिक जगातील आव्हानांवर योगाचा समग्र मार्ग

बदलापूरमध्ये विशेष प्रशिक्षणाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0

बदलापूर | प्रतिनिधी – Yoga Workshop Maharashtra आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत असलेल्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक समस्यांवर योग हा प्रभावी आणि समग्र उपाय असल्याचा संदेश बदलापूर येथे आयोजित विशेष प्रशिक्षण कार्यक्रमातून देण्यात आला. आरोग्य योगा अँड नॅचरोपॅथी इन्स्टिट्यूट आणि जीवनदीप यांच्या संयुक्त विद्यमाने “आधुनिक जगातील आव्हाने आणि योगाची समग्र दिशा” या विषयावरील एकदिवसीय प्रशिक्षण उत्साहात पार पडले.

सोहळा बँक्वेट हॉल येथे सकाळी ९ ते सायंकाळी ४.३० या वेळेत झालेल्या या कार्यक्रमात योग शिक्षक,योग साधक,योगशास्त्राचे विद्यार्थी आणि योग क्षेत्रात समाजासाठी कार्य करण्याची इच्छा असलेल्या अनेक सहभागींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

प्रमुख मार्गदर्शक डॉ.विजय कुकरेजा यांनी आधुनिक जीवनशैलीमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक आणि आध्यात्मिक आव्हानांचे सखोल विश्लेषण करत योग हा केवळ आसन किंवा प्राणायाम नसून व्यक्तिमत्त्व विकासाची संपूर्ण जीवनपद्धती असल्याचे स्पष्ट केले. समाजात आरोग्यदायी जीवनशैली, संस्कार आणि सकारात्मक विचार रुजविण्यासाठी योग शिक्षकांनी व्यापक दृष्टीकोन स्वीकारण्याचे आवाहनही त्यांनी केले.

या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश सहभागींच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक परिवर्तन घडवून त्यांना स्वतःची अधिक सक्षम आणि जागरूक आवृत्ती घडविण्यास प्रेरित करणे हा होता. जुन्या सवयी आणि विचारसरणीत अडकून राहिल्यास अपेक्षित यश मिळत नाही, तर योगाच्या माध्यमातून अंतर्गत बदल स्वीकारल्यास जीवनात सर्वांगीण प्रगती साधता येते, असे मार्गदर्शन डॉ. कुकरेजा यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी समन्वयक स्नेहल पाटील, योग शिक्षिका सायली जाधव, जयश्री भांबरे आणि सोनल झाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.यावेळी योगा करिअर मास्टरी प्रोग्राम (YCMP) यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या सहभागींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या अभ्यासक्रमातून योग शिक्षक म्हणून समाजात प्रभावी कार्य करण्यासाठी आवश्यक समग्र दृष्टिकोन आणि व्यावसायिक मार्गदर्शन देण्यात आले.

तसेच एम.ए.योगशास्त्र प्रथम वर्ष पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनीही या विशेष प्रशिक्षणात सहभाग घेतला.या प्रशिक्षणामुळे ( Yoga Workshop Maharashtra)त्यांना द्वितीय सत्राच्या अभ्यासक्रमाचा अधिक सखोल अभ्यास करण्यासाठी आवश्यक दिशा मिळाल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!