बाप्पाच्या आगमनामुळे मालिकांमध्ये रंजक वळण

0

मुंबईझी मराठीवरील सर्व मालिका आणि त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांच्या आवडत्या आणि त्यांच्या घरातील एक आहेत असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. नुकत्याच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या ‘मन झालं बाजिंद’, ‘मन उडू उडू झालं’, ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि ‘तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं?’ या मालिकांना प्रेक्षकांनी सुरुवातीपासूनच पसंती दर्शवली आहे. सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा जल्लोष आहे, 

 
झी मराठीवरील मालिकांमध्ये देखील बाप्पाचं आगमन झालं आहे आणि बाप्पाच्या आगमनामुळे या मालिका रंजक वळणावर आल्या आहेत. बाप्पाच्या येण्याने या मालिकेमध्ये देखील नव्या नात्यांचा श्रीगणेशा होतोय.मन झालं बाजिंद या मालिकेत रायाच्या घरी गणरायाचं आगमन होत आणि त्याचवेळी कृष्णा कारखान्यातील हिशोबातला घोळ उघडकीस आणते. तसेच गणपतीमध्ये गौरीपूजनच्या निमित्ताने रायाच्या घरी मुलींना जेवायला बोलावलं जातं. तेव्हा गुली मावशी कृष्णाचा अपमान करते व तिला वाईट वागणूक देते. कृष्णाचं लग्न रायाबरोबर लावून द्यायचं गुली आणि ह्रतिकमध्ये बोलणं होतं. पण कृष्णा आणि राया एकमेकांना स्वीकारतील का? मन उडू उडू झालं मालिकेत दिपू घरातल्या गणपतीची पूजा आटपून बहिणीसोबत गणेशवाडीच्या राजाला प्रसाद घेऊन जाते आणि तिथे तिची आणी इंद्राची भेट होते. 
An interesting turn in the series due to the arrival of Bappa
गर्दीचा फायदा घेऊन एक मुलगा दिपूची छेड काढतो. हे पाहून इंद्रा रागाने लालबुंद होतो. इंद्रा त्याची शाळा घेणार कि दिपूने सांगितलेल्या अहिंसेच्या मार्गाने त्याला समजावणार? तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं मालिकेत गणेशोत्सवात परंपरेनुसार भरपूर मोदक करण्याची प्रथा देशमुखांच्या घरी असल्याचं अदितीला कळतं. त्यात एक मिठाचा मोदक आहे हा मोदक दरवर्षी साऱ्याजणी गुपचूप ठरवून रत्नाक्काला देतात. रत्नाक्कावरील हे प्रेम पाहून अदिती हळवी होते. तर दुसरीकडे नानी खाऱ्या मोदकाचा गोंधळ घालते. तो खारा मोदक कोणाच्या वाट्याला येणार?

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.