नाशिक -अशोका बी. एड. महाविद्यालयात बी. एड. सीईटी नोंदणी प्रक्रिया सुरू असल्याची माहिती प्रवेश समितीच्या वतीने देण्यात आली. बी. एड. महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या प्रवेश परीक्षा विभागाच्या वतीने सीईटी परीक्षेचे आयोजन करण्यात येते. त्यासाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया दिनांक २ ऑगस्ट पासून ते ९ ऑगस्ट पर्यंत सुरू रहाणार आहे.
कोरोना परिस्थिती चा विचार करता विद्यार्थी हिताच्या दृष्टीने अशोका बी. एड. महाविद्यालयात मोफत सीएटी अर्ज भरण्यासाठी मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जात आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सदर संधीचा लाभ घ्यावा असे आव्हान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष रुकारी यांनी केले. महाविद्यालयाच्या प्रस्तुत उपक्रमाचे संस्थाचे सचिव मा. श्रीकांतजी शुक्ला, उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी. एम. गुजराती, प्रशासक डॉ. नरेन्द्र तेलंराधे यांनी विशेष कौतुक केले.
सदर कामकाजासाठी डॉ. प्रीती सोनार, प्रा. सरीता वर्मा, प्रा. समृद्धी चेपे, प्रा. सविता शिंदे, डॉ. मोनाली काकडे, प्रा. गणेश वाघ, प्रा. आशिष गुरव ,श्री. गणेश पारवे, श्री. राजेश सावदेकर, ग्रंथपाल शुभदा दुकले या सर्वांचे सहकार्य लाभत आहे . अधिक माहितीसाठी डॉ. प्रीती सोनार 9370909644 व प्रा. समृद्धी चेपे 7588703197 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.