मुंबई – बिग बॉस मराठीच्या घरामध्ये सुरू असलेल्या हल्लाबोल टास्कने घरामध्ये बराच धुमाकूळ घातला आहे. शब्दांचा मारा थांबायचा काही नावं घेत नाहीये असं दिसून येत आहे. एकाचा टोंबणा झाला की दूसरा लगेच मागून बोलायला तयारच आहे. या टास्कमध्ये जय, मीरा – गायत्री देखील काही थांबायचं काही नाव घेत नाहीये. एका मागून एक काही ना काही शब्दफेक सुरू आहे. एकही शब्द कोणीच पडू देत नाहीये. विकास आणि विशाल मोटार बाईक बसल्यापासून सदस्यांची बडबड सुरू आहे. आज टास्कमध्ये काय काय होणार आहे हे कळेलच आजच्या भागामध्ये.
याच टास्क मध्ये विकासने ऐकून घेतले आणि तो आज एक चॅलेंज देणार आहे, “गायत्री आणि मीरा एवढं बोलत आहेत मी त्यांना Open Challenge देतो, जर तुमच्यामध्ये दम असेल तर उद्या पहिले तुम्ही येऊन दाखवा ! आम्ही ज्याप्रकारे दोन मुली पाठवून खेळ सुरू केला तसं तुम्ही या. यानंतर शब्दाला शब्द वाढत जाणार आहे. मीराचं त्यावर उत्तर असणार आहे “तू आमच्या मागे खेळलास” गायत्री आणि विकास बॉंडिंग आपण बघितलचं आहे पण ती देखील या टास्क मध्ये त्याला बोलताना दिसणार आहे, “तू तर बोलू नकोस, तू विशालच्या मिठीत खेळतो आहेस”. विकास म्हणाला, “मला काहीच फरक पडत नाही……… हा वाद इथेच थांबला की पुढे अजून वाढला कळेलच आजच्या भागामध्ये दिसणार आहे.
बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.