मंदिरे उघडण्यासाठी उद्या भाजपचे राज्यव्यापी शंखनाद आंदोलन

0

नाशिक – ठाकरे सरकारला मंदिरे खुली करण्याचा इशारा देण्यासाठी श्रीकृष्णजयंती आणि चौथ्या श्रावण सोमवारच्या पवित्र मुहूर्तावर भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडी तर्फे सोमवार दि. ३० ऑगस्ट २०२१ रोजी राज्यव्यापी शंखनाद आंदोलन होणार आहे.उद्या सकाळी ९ वाजता रामकुंड, पंचवटी येथे टाळ,घंटा व शंख वाजवून भाजप आध्यात्मिक आघाडी चे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले, भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, आमदार राहुल ढिकले, प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब सानप, महानगर अध्यक्ष गिरीश पालवे यांच्या उपस्थितीत शंखनाद आंदोलन होणार आहे.

या संदर्भांत घोषणा आध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी दि. २६ ऑगस्ट रोजी केली होती.राज्य सरकारने पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे पुन्हा बंद करुन ठेवली आहेत.आता सर्व व्यवहार सुरळित केले असताना फक्त मंदिरे बंद ठेवण्यात आली आहेत. मंदिरांवर अवलंबून असलेल्या लाखो लोकांच्या उपजीवीकेवर गदा आल्याने त्यांची उपासमार होते आहे. त्यांना राज्य सरकार कोणतीही आर्थिक मदत देत नाहीआणि मंदिरे देखील उघडली जात नाहीत. देशातल्या अन्य राज्यात मात्र मंदिरे सुरु आहेत.

या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचा संपूर्णपणे पाठिंबा असून पक्षाच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी या आंदोलनात सक्रियपणे सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.