मुंबई – महाराष्ट्राचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली असून अनिल परब यांना मंगळावर दिनांक ३१ ऑगस्ट ला चौकशी साठी ईडी कार्यलयात हजर राहण्यास सांगितले आहे. अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावली आल्याची माहिती शिवेसना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत जन आशीर्वाद यात्रेची सांगता होताच अपेक्षेप्रमाणे अनिल परब यांना ईडीची नोटीस बजावण्यात आली असे म्हटलं आहे.
संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, “शाब्बास! जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत. chronology कृपया समज लिजीये. कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र” अशा शब्दात संजय राऊत यांनी अनिल परब यांच्या नोटीसवरुन भाजपवर निशाण साधला आहे. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा नारायण राणेंना केंद्रस्थानी ठेवून भाजपवर आरोप केला आहे.
शाब्बास!
जन आशीर्वाद जत्रेची सांगता होताच अपेक्षे प्रमाणे अनिल परब यांना ई.डी.ची नोटीस बजावण्यात आली . वरचे सरकार कामाला लागले. भुकंपाचा केंद्रबिंदू रत्नागिरीत होता. परब हे रत्नागिरीचे पालक मंत्री आहेत.
chronology कृपया समज लिजीये.
कायदेशीर लढाई कायदयानेच लढू..जय महाराष्ट्र— Sanjay Raut (@rautsanjay61) August 29, 2021