अत्तर व्यावसायिकाकडे सापडले करोडो रुपये : ८ मशीनला पैसे मोजण्यासाठी लागले २४ तास

0

नवी दिल्ली – कानपूरमधील एका अत्तर व्यावसायिकाच्या घरावर आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी  धाड टाकली असता हाती करोडो रुपयांचे घबाड लागलं आहे. कानपूरमध्ये व्यवसाय करणाऱ्या पियूष जैन यांच्यासी संबंधित मालमत्तांवर ही छापेमारी करण्यात आली. यावेळी अधिकाऱ्यांच्या हाती अंदाजे १५० कोटींच्या वर रोख रक्कम लागली आहे.

आयकर खात्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईचा फोटो समोर आला असून यामध्ये नोटांचे ढीगच्या ढीग दिसत आहेत. एका फोटोत कपाट नोटांनी भरल्याचं दिसत आहे. हे पैसे प्लास्टिक पिशवीत ठेवत त्यावर चिकटपट्टी लावून ठेवण्यात आल्याचं दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत अधिकारी खाली बसून पैसे मोजताना दिसत आहेत. यावेळी त्यांच्यासमोर नोटांचा ढीग लागला आहे .एकूण किती रक्कम सापडली हे अद्याप समजू शकलेलं नाही. अधिकारी पैशांची मोजणी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, नुकतीच ही धाड टाकण्यात आली असून कारवाई सुरु आहे. कानपूर, उत्तर प्रदेश, मुंबई आणि गुजरातमध्ये ही कारवाई सुरु आहे. करचोरी केल्याप्रकरणी जीएसटीकडून ही कारवाई करण्यात आली. यानंतर आयकर विभागही कारवाईत सहभागी झालं.

बनावट बिलं बनवून हे सर्व पैसे गोळा करण्यात आले होते असं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बनावट कंपन्यांच्या नावे ही बिलं तयार करण्यात आली होती. एक बिल ५० हजारांचं असून अशी २०० हून अधिक बिलं जीएसटीच्या  पेमेंटविना तयार करण्यात आली होती. चार ट्रकमध्ये ही बिलं सापडली असून ट्रक ताब्यात घेण्यात आले आहेत.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.