कुसुमावतींचा अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न !

0

मुंबई – ढालेपाटीलांच्या घरामध्ये अपर्णाच्या पुन्हा एकदा येण्याने घरातील वातावरण ताणतणावाचे झाले आहे. अपर्णाच्या स्वभावामुळे सर्वाना त्रास होऊ लागला असून सुजित सोबतच घरातील सगळ्यांच्या डोक्यावर येऊन ती बसली. तरी देखील संजू – रणजीत या परिस्थितीतून मार्ग काढत आहेत. पण अपर्णाच्या धमक्या मात्र काही कमी होत नाहीये तर दुसरीकडे पंजाबराव, राजश्री आणि दादासाहेब यांची कटकारस्थानं काही थांबत नाहीत . दादासाहेब – राजश्री देखील काहीतरी कटकारस्थान करत आहेत यावर संजूला संशय आहे ?

संजू – रणजीत समोर नवीन संकटी उभी रहातात, ढाले – पाटील कुटुंबाविरोधात कटकारास्थान रचली जातात पण आजवर संजूने खंबीरपणे रणजीतच्या साथीने त्यावर मात केली आहे. अपर्णाच्या वागणुकीने आता तिचाच घात तर नाही ना होणार ? असं कुठेतरी वाटू लागलं आहे. अपर्णा राजश्रीला पैसे मागणार असून ते कुसुमावती आणि संजूला कळणार आहे. यावर उपाय म्हणून कुसुमावती संजूला सांगणार आहे मी बघते अपर्णाचं काय करायचे. दुसरीकडे मोना आणि अपर्णामध्ये बाचाबाची होणार आहे. ज्यामध्ये अपर्णा मोनाला खूप काही सुनावणार आहे. मोना रागाने अपर्णाला कानाखाली मारणार आहे. ज्यानंतर अपर्णा सुजितला धमकणार आहे. हे सगळं झाल्यानंतर एकीकडे आईसाहेब आणि दुसरीकडे सुजित अपर्णाला भेटायला निघणार आहेत. पण, जेव्हा संजू – रणजीत पोहचतात तेव्हा अपर्णाचा मृत्यू झालेला दोघांना दिसणार आहे.

नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दिसते आहे अपर्णा कुसुमावती यांना धमकी देते आहे आता त्याचे परिणाम तिला भोगावे लागणार ? कुसुमावती अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार ? सुजित अपर्णाला काय सांगणार ? कोणावर येणार अपर्णाच्या खुनाचा संशय ? जाणून घेण्यासाठी बघा राजा रानीची गं जोडी सोम ते शनि संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.