मुहूर्त इन्व्हेस्टमेंट : नव्या वर्षात तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाचा नवा प्रारंभ

0

प्रभाकर तिवारी, चीफ ग्रोथ ऑफिसर, एंजेल वन लिमिटेड

मुंबई – सणासुदीच्या उत्साहात आता कुठे रंग भरू लागला आहे. आनंद आणि उत्सवाची पखरण करत ही सणासुदीचा हा हंगाम नव्या सुरुवातीसाठी एक मंगलदायक प्रतीक आहे. हिंदू कालगणनेनुसार हा नव्या वित्तवर्षाचा प्रारंभ असतो. या काळात केलेल्या गुंतवणुकीवर भरभक्कम परतावा मिळतो, अशी मान्यता आहे. सोने आणि इतर बहुमूल्य धातूंच्या खरेदीसोबतच लोक स्टॉक्समध्येही गुंतवणूक करतात. दरवर्षी दिवाळीला नेहमीच्या शेअर बाजाराच्या नेहमीच्या वेळापत्रकाव्यक्तिरिक्त एका तासाच्या सत्रासाठी स्टॉक्स एक्स्चेंजेस उघडण्यात येतात. त्याला ‘मुहूर्त ट्रेडिंग’ असे म्हटले जाते. तुम्ही गुंतवणुकीच्या क्षेत्रात पाऊल टाकत असाल तर हा मंगलदिन केवळ ट्रेडिंगच नव्हे तर गुंतवणूक म्हणूनही तुमच्या वित्तीय प्रवासाचा श्रीगणेशा करण्यासाठी सर्वोत्तम ‘मुहूर्त’ आहे.

Prabhakar Tiwari, CGO, Angel One
प्रभाकर तिवारी, चीफ ग्रोथ ऑफिसर, एंजेल वन लिमिटेड

इन्व्हेस्टमेंट ब्रोकिंग अॅप्स आणि वेबसाइट्स या दिवशी रोखे बाजारात पाऊल टाकण्यासाठी तुमचा प्रवास सुकर करतील. उगवत्या फिनटेक व्यासपीठांनी टेकसॅव्ही मिलेनिअल्स आणि जनरेशन झेडसाठी ही प्रक्रिया अगदी सुलभ करून टाकली आहे. डीमॅट अकाउंट उघडून स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला फक्त एक स्मार्टफोन आणि इंटरनेट कनेक्शनचीच गरज आहे.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुकीचे काही महत्वाचे फायदे:

संभाव्य दीर्घकालीन परतावा:

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून भरीव परतावा कमावण्याची मोठी संधी असते. बाँड्स आणि मुदत ठेवींसारख्या इतर संपत्ती श्रेणींच्या तुलनेत स्टॉक्स दीर्घ कालावधीत जास्त प्रमाणात करपश्चात गुंतवणूक नफा मिळवून देतात. तुम्ही योग्यवेळी शेअर बाजारात उतरला तर कमीत कमी वेळेत आणखी जास्त परतावा मिळवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, महागाई विरुद्ध इतर परिसंपत्ती श्रेणींच्या तुलनेत उच्च परतावा देण्याचा आपला ट्रॅक रेकॉर्ड सिद्ध केलेला आहे. यासोबतच बहुतांश कंपन्या आपल्या गुंतवणूकदारांना दरवर्षी लाभांशाची रक्कम देत असतात. स्टॉक्समधील गुंतवणुकीवरची ही अधिकची मिळकत असल्याचे मानता येईल.

उच्च तरलता (रोखीत रूपांतर करण्याची क्षमता):

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे, उच्च पातळीवरील तरलतेची सुविधा (रोख रकमेत रूपांतर करण्याची क्षमता). गुंतवणुकीच्या इतर साधनांच्या विपरित स्टॉक्सचे कधीही सहजपणे रोख रकमेत रूपांतर केले जाऊ शकते. भारतात राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) आणि बॉम्बे शेअर बाजार (बीएसई) ही दोन प्रमुख स्टॉक एक्स्चेंजेस आहेत. ती दररोज मोठ्या प्रमाणांत व्यवहार करतात. यामुळे बाजारात उच्च तरलतेचा प्रवाह येत असतो. यामुळे, नव्या युगातील गुंतवणूकदार अगदी एका क्लिकवर शेअर्सची खरेदी किंवा विक्री करू शकतात. अर्थात आपण त्यांचे रोख रकमेत कधीही रूपांतर करू शकतो, याची जाण असतेच.

गुंतवणूक करण्यातील लवचिकता:

स्टॉक मार्केट्स गुंतवणूकदारांसाठी शेअर्समधील सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅनसारख्या गुंतवणुकीच्या विस्तृत श्रेणी पुरवतात. हे विशेषकरून रोखे बाजारात आपल्या गुंतवणुकीचा प्रवास सुरू करणाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. जोखमीचा घटक लक्षात घेऊन बहुतांश नवशिके गुंतवणूकदार छोट्या गुंतवणुकीचा पर्याय अवलंबतात. अन् शेअर बाजार येथेच खरी लवचिकता प्रदान करतो. तुम्ही गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर आर्टिफिअल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंगसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून तुमचा स्टॉक ब्रोकर तुम्हाला तुमच्या बजेट आणि प्राधान्यक्रमाप्रमाणे स्टॉक्सची निवड करून देण्यात सहाय्य करतो. तथापि, शेअर बाजारात गुंतवणूक करणे ही कालबद्ध प्रतिबद्धता नसते. तुम्ही तुमच्या वेगाने आणि सवडीने घसरणीच्या काळात खरेदी करत तेजीच्या काळात विक्रीचे काम करू शकता.

भरभराटीतील अर्थव्यवस्थेतून लाभ मिळवणे:

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करून तुम्ही थेट भरभराटीतील अर्थव्यवस्थेच्या फायद्यांची फळे चाखू शकतात. कारण, अशा अर्थव्यवस्थांत कंपन्यांचा महसूल हा कितीतरी पटींनी वाढत असतो. तसेच यात कंपन्यांचे मूल्यही वाढते, म्हणजेच त्यांच्या शेअर्सच्या किमतींतही वृद्धी होत असते. परिणामी, शेअर बाजारातील तुमच्या गुंतवणुकीचे मूल्यही वाढत असते.

अंतिम नोंद:

स्टॉक मार्केटमधील गुंतवणूक ही सुरक्षित आणि पारदर्शक प्रक्रियेसोबतच दीर्घ कालावधीच्या कमाईचे साधन ठरते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, उद्दिष्टांचे नियोजन करत असताना महागाईला तोंड देण्याचे हे एक मूल्यवान साधन आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान संचालित प्लॅटफॉर्म्सनी अगदी नवशिक्यांसाठीही गुंतवणुकीच्या नव्या संधी शोधणे, ट्रेडिंग आणि गुंतवणूक, रोखे बाजारातील ट्रेंडवर नजर ठेवणे अगदी सहजसुलभ करून टाकले आहे. गुंतवणुकीचा प्रारंभ करण्यासाठी आजही उशीर झालेला नाही. यंदा स्टॉक एक्स्चेंजकडून ४ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६:१५ ते ७:१५ वाजेदरम्यान मुहूर्त ट्रेडिंग केले जाणार आहे. चला तर मग, यंदाच्या सणासुदीच्या हंगामात तुमच्या गुंतवणुकीच्या प्रवासाला प्रारंभ करून आर्थिक भरभराटीकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज होऊयात. या दिवाळीत शुभशकुन म्हणून शेअर्सची खरेदी करा आणि आपल्या प्रियजनांना ते भेट म्हणूनही द्या!

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.