नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करणार : नवीन कार्यकर्त्यांना संधी
नाशिक : नाशिक जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व सेलच्या जिल्हा, विधानसभा मतदार संघ, तालुका व शहर कार्यकारिणींची नव्याने पुनर्रचना करून येत्या ३० ऑगस्ट पर्यंत मान्यतेसाठी जिल्हा कार्यालयात सादर कराव्यात अशी सूचना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष, विधानसभा मतदार संघांचे अध्यक्ष, तालुकाध्यक्ष व शहराध्यक्ष यांची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे घेण्यात आली त्यावेळी अॅड.रविंद्रनाना पगार बोलत होते.
पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांचा समावेश करतांनाच निष्क्रिय पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करून नव्या कार्यक्षम कार्यकर्त्यांना नवीन कार्यकारिणीत संधी द्यावी असेही अॅड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी सांगितले. आगामी काळातील जिल्हा परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना अधिक बळकट करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्रनाना पगार यांनी यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी बैठकीस राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष यशवंत शिरसाट, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नंदन भास्करे, राष्ट्रवादी सेवादलाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, राष्ट्रवादी सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष नंदकुमार कदम, राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण सेलचे राहुल सालगुडे, विजय पवार, बागलाण विधानसभा अध्यक्ष माजी आमदार संजय चव्हाण, दिंडोरी तालुकाध्यक्ष भास्कर भगरे, निफाड तालुकाध्यक्ष राजेंद्र डोखळे, मालेगाव तालुकाध्यक्ष संदीप पवार, मालेगाव बाह्य विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष विनोद चव्हाण, निफाड पूर्व तालुकाध्यक्ष जयदत्त होळकर, कार्याध्यक्ष भाऊसाहेब भवर, येवला तालुकाध्यक्ष साहेबराव मढवई, कळवण तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, नांदगाव तालुकाध्यक्ष विजय पाटील, नांदगाव विधानसभा अध्यक्ष विनोद शेलार, बागलाण तालुकाध्यक्ष शैलेश सुर्यवंशी, नांदगाव शहराध्यक्ष बाळकाका कलंत्री, देवळा शहराध्यक्ष दिलीप आहेर, चांदवड शहराध्यक्ष प्रकाश शेळके, कळवण शहराध्यक्ष जितेंद्र पगार आदी उपस्थित होते.