आजचे राशिभविष्य मंगळवार ९ जुलै २०२४  

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक ९ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी,नाशिक
आषाढ शुक्ल तृतीया/चतुर्थी. क्रोधीनाम संवत्सर.  
राहुकाळ – दुपारी ३ ते ४.३० 
“आज संध्याकाळी ७.०० पर्यंत चांगला दिवस आहे” 
चंद्र नक्षत्र – अश्लेषा/मघा. 
आज जन्मलेल्या बाळाची राशी –  कर्क/ (सकाळी ७.५३ नंतर) सिंह.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही.अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क –8087520521)

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा हर्षलशी केंद्रयोग आहे. कौटुंबिक वाद संभवतात. आर्थिक नियोजन चुकू शकते. पाण्यापासून सावध रहा.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) अनुकूल दिवस आहे. समाजकार्य कराल. मन अस्थिर राहू शकते. मोठे निर्णय आज नकोत.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ झाले तरी खर्च देखील होणार आहेत. काही सुखद अनुभव येतील. संध्याकाळ आनंदाची.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो)  अचानक लाभ होतील. मात्र त्यासाठी सावधान राहिले पाहिजे अन्यथा संधी हातून निघून जाईल. घशाची काळजी घ्या.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज तुमचं राशीत चंद्राचे आगमन होत आहे. मन प्रसन्न राहील. नोकरीच्या ठिकाणी मनःस्ताप देणाऱ्या घटना घडू शकतात. संयम ठेवा.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) प्रतिकूल ग्रहमान आहे. महत्वाचे निर्णय आज नकोत. फक्त नेहमीची कामे चालू ठेवावीत. प्रवास टाळावेत.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कामे मार्गी लागतील. मात्र वाहन जपून चालवा. सावधानता बाळगा.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु)  घरगुती कामे मार्गी लागतील. नोकरीच्या ठिकाणी कामाचा तणाव वाढेल. पत्नीशी मतभेद संभवतात.

धनु:-(ये, यो, भा, भी,भु,धा, फा, ढा) सहावा हर्षल आणि नववा चंद्र यांचा केंद्र योग आहे. प्रवासात आरोग्याच्या तक्रारी निर्माण होऊ शकतात. नोकरांकडून त्रास संभवतो.आध्यात्मिक प्रगतीसाठी चांगला दिवस आहे.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अष्टम स्थानी चंद्र आहे. मनाची चलबिचल होईल. चुकीचे निर्णय होऊ शकतात. शेअर्स मध्ये नुकसान संभवते.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) घरगुती समस्यांना तोंड द्यावे लागेल. पत्नीशी मतभेद होऊ शकतात. सामाजिक कार्यात विनाकारण मनस्ताप होईल.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आर्थिक लाभ होतील. आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. हाताची काळजी घ्या.

(व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521)

९ जुलै रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
तुमच्यावर मंगळ आणि नेपच्यून या दोन ग्रहांचा प्रभाव आहे. तुम्ही अत्यंत आक्रमक, प्रतिकार करणारे, धाडसी आहात. कोणतीही आणि कितीही प्रतिकूल परिस्थिती असली तरी तिला तोंड देण्याची तुमची क्षमता आहे. पराभव तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही पोलीस, सैनिक, एयरफोर्स यामध्ये उत्तम यश मिळवू शकतात. तुमच्यामध्ये नाजूकपणा नसतो किंवा फारसे उत्तम वक्तृत्व नसते मात्र तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात. शक्यतो तुम्ही इतरांवर टीका करणे टाळले पाहिजेत आणि बोलताना शब्द जपून वापरले पाहिजेत. तुमचा स्वभाव शीघ्रकोपी आहे.

तुम्हाला मैदानी खेळांची आणि व्यायामाची आवड आहे. भिन्नलिंगी व्यक्ती कडे तुम्ही आकर्षित होतात. तुमची स्मरणशक्ती चांगली आहे. आयुष्यात झटपट पैसा मिळावा असे तुम्हाला वाटते मात्र तुम्ही जुगारी वृत्त टाळले पाहिजे. भूतकाळात तुम्ही बऱ्याचदा वावरत असतात आणि तुमच्या कल्पना भरमसाठ असतात. गरीब लोकांबद्दल तुम्हाला सहानुभूती वाटते. दुःखी आणि अपंग लोकांसाठी तुम्ही देणगी देतात. तुमचे वागणे चमत्कारिक आणि लहरी असू शकते. तुमची मनाची शक्ती अफाट असून तुम्हाला गूढ अनुभव येतात. प्रवासामुळे तुमच्या आयुष्यावर परिणाम होतात. तुम्ही विचारवंत आणि अभ्यास वृत्तीचे आहात. चारचौघांपेक्षा तुमचे विचार पुढे गेलेले असतात. तुम्ही तुमच्या विचारांबद्दल ठाम आहात.

व्यवसाय:-तुम्हाला सर्वच क्षेत्रांमध्ये यश मिळते मात्र पोलीस,सैन्य,गुप्तहेर,राजकारण,डॉक्टर,केमिस्ट,लोखंड संबंधित,अग्नी संबंधित यंत्रसामग्री यात यश मिळते.
शुभ दिवस:-सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार.
शुभ रंग:-तांबडा.
शुभ रत्न:-पुष्कराज, मोती, माणिक.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)

Managesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!