नाशिक – नाशिकच्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक सानेगुरुजी कथामाला बालभवन तर्फे नवरात्रानिमित्त महिलांसाठी उखाणे स्पर्धा व वेशभूषा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत १८ वर्षावरील महिला सहभागी होऊ शकतात.
ही स्पर्धा शुक्रवार दि.२९ऑक्टोबर,२०२१ रोजी दुपारी ३.०० वा. प.सा. नाट्यगृह, नाशिकयेथे आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठीची नोंदणी – प्रत्यक्ष येऊन सावाना कार्यालयात दि. २६ऑक्टोबर, २०२१ पर्यंत करावी.विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार आहेत.अशी माहिती आयोजकांतर्फे देण्यात आली आहे.
स्पर्धेचे नियम व अटी खालीलप्रमाणे
१ परीक्षकांचा निर्णय अंतिम व सर्वांना बंधनकारक राहील.
२ निवड करताना सादरीकरण व समन्वयाचा विचार केला जाईल.
३ वेशभूषा आणि सादरीकरण स्पर्धेसाठी वेळ पाच मिनिटे.
४ स्पर्धा संपल्यानंतर बक्षिसांची नावे जाहीर करण्यात येतील.
५ वरील दोन्ही स्पर्धांसाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जाणार नाही.