शनिशास्त्र : साडेसातीत मीन राशीसह सर्व राशीचा विचार 

हरिअनंत,नाशिक 

0

हरिअनंत,नाशिक 

जन्मराशीपासून शनी पहिला येईल,तर शरीरास आजार उत्पन्न होऊन मस्तकास पीडा होते. शारीरिक दुर्धर प्रसंग ओढवतात. स्थलांतर व प्रवासाचे कामात अतिशय कष्ट होतात. स्त्रीला पीडा व असभ्य लोकांकडून अनेक प्रकारे त्रास व अपवाद येतात.उद्योगधंदा व नोकरी यांची स्थिती अनिश्चित राहते. कार्यास विलंब व अडथळे येतात.

 

साडेसाती शनी  मीन राशीसह सर्व राशीचा विचार

 

शनिवाहनाचा विचार जन्मनक्षत्रापासून ते शनी नक्षत्रापर्यंत मोजावा. नावाचा भाग द्यावा जर बाकी 1 राहील तर गर्दभप्राप्ती,2 ने घोडा,3ने हत्ती, 4 ने मेंढा,5 ने कोल्हा, 6 ने सिंह, 7 ने कावळा , 8 ने मोर , 9 ने हंस वाहन असा लाभ होतो.गर्दभ वाहनाने रत्ननुकसानी,अश्वाने उन्नती, हत्तीने ऐश्वर्य, मेंढ्याने दुःख, कष्ट, त्रास इत्यादि, कोल्ह्याने मनाची उद्दीग्नता, व सिंहाने विजय, कावळ्याने पलायन  (स्थलांतर) मोराने सन्मान व हंस वाहनाने ऐश्वर्यात वाढ होते.

 

शनीचक्र जन्मनक्षत्रापासून शनीच्या नक्षत्रापर्यंत मोजावे. जन्मनक्षत्रात शनी असेल तर रोग , तेथून दुसऱ्यास्थानी  अतिशय कष्ट  पडतील.तेथून 1 स्थानी असेल तर मरणप्राय कष्ट पडतील. तेथून 5व्या स्थानी असेल तर धनलाभ त्याच्या मागाहून 4 या स्थानी असेल तर बंधन, 6व्या स्थानी सुख, तेथून चौथ्या स्थानी असेल तर धनलाभ, तिथून 3 स्थानी असेल तर अति धनलाभ होईल.

 

शनिस्तोत्र- पिप्लाद उवाच–

 

– नमस्ते कोणसंस्थाय पिंगलाय नमोअस्तू ते

– नमस्ते विष्णुरूपाय कृष्णा च नमोअस्तू ते

– नमस्ते रौद्र देहाय नमस्ते कालकाजये

– नमस्ते यम संज्ञाय शनैश्वर नमोअस्तू ते

– प्रसाद कुरु देवेश दीनस्य प्रणतस्यच

या स्तोत्राचे नित्य सकाळी पठाण केल्यास शनीचे अरिष्ट व साडेसातीचा त्रास निश्चितच कमी होतो.

शनीचा प्रत्यक्ष विचार.

सर्वसाधारण बाबतीत लोकांना इतर ग्रहांच्या बाबतीत विशेष ज्ञान असो व नसो, पण कमीत कमी शनी बाबत सर्वजण काही ना काही जाणतातात  मग तो कोणत्याही धर्माचा असो अथवा  नास्तिक. शनिपासून प्रत्यक्ष अनुभव येतो, तेंव्हा त्याच्या अस्तित्वाविषयी खात्री अगर विश्वास पटतो. शनिमुळे (क्रमशः) भाग-१५२

शुभम भवतु …

मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव   सावधानता, आजार, व्यवसाय,  आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत

 

Hari Ananat -Shani Shastra
हरिअनंत,नाशिक

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.