हरिअनंत,नाशिक
आपल्या संसारयात्रेत गुरुचे अधिष्ठान असल्याखेरीज शांतता व समाधान असणार नाही म्हणून गुरू विषयी आपण कायम दक्ष असलं पाहिजे. मीन राशीला २९ एप्रिल २०२२ शुक्रवारी शनीचे राशीपरिवर्तन होत आहे.शनी कुंभ राशीत प्रवेश करताच, धनू राशीची साडेसाती समाप्त होते आणि मीन राशीचा साडेसातीचा प्रथम चरण आरंभ होतोय… मीन राशिवाल्यांसाठी हा सावधानतेचा इशारा आहे, शनी आणि गुरूची कृपा आहे.गुरू तर मीन राशीचा राशी स्वामी आहे गुरू थोडाफार नाराज असला तरी आपल्या शिष्यासाठी नेहमीच साहाय्यकारी असतो. गुरू प्रेमळ आहे वारंवार ते समजावून सांगतात पण शनी राशीत प्रवेश करण्यापूर्वी सावधानतेचा इशारा करतो, शनीच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केले तर साडेसातीत खूप त्रास होतो.
शनी जन्मराशीपासून १२,१ व २ रा असला म्हणजे साडेसाती आहे असे निश्चित समजावे. साडेसातीत अनेकांना अनेक प्रकारे त्रास भोगावा लागतो. कित्येकांना सांपात्तिक अडचणी व द्रव्यनाश, तर कित्येकास मनुष्यहानी आणि उद्योगधंद्याचे अति प्रमाणात नूकसान झालेले पाहण्याचा प्रसंग येतो. काही लोकांना साडेसातीत अति कठीण शिक्षा भोगावी लागते.तर काही आजाराने पछाडलेले व जीवाला कंटाळलेले आणि ईश्वराची नित्यश: प्रार्थना करणारे हतभागी प्राणीही काही आहेत साडेसाती थोडी तरी भोवली नाही असा प्राणी विरळा. शनीचे प्रत्येक स्थानाचे फल व त्याचे कारण असे आहे की, नुसत्या साडेसातीतचं शनीचा त्रास भोगावा लागतो असे नव्हे, तर शनी ज्या ज्या वेळी अनिष्ट येतो त्या- त्या वेळी त्याचे फल वाईटच मिळते असा गैरसमज करुन घेउ नये.
ज्या दिवशी शनी राशीतून संक्रमण करेल, त्या दिवशी चंद्र नक्षत्राची राशी बनेल. जर तो राशीपासून १-६-११ व्या स्थानात असेल तर तो भविष्यकाळातील राशीचा शनी लाभदायक, व शुभदायक होईल २- ५-९ या स्थानात असेल तर साधारण लाभकारक व शुभ होईल ४-८-१२ या स्थानात असेल, तर तो शनी अनिष्ट आहे असे समजावे.
शनी एका राशीत अडीच वर्षे राहतो जन्मराशीपासून १२-१-२ या तीन राशी मिळून शनीचा काल साडेसात वर्ष राहतो. जन्मराशीपासून जेंव्हा शनी ४- ८ स्थानी असेल,तर त्याला वृद्धी शनी म्हणतात हा शनिं अतिशय कष्टप्रद असतो. जेंव्हा शनी जन्मराशीपासून १२ व्या स्थानी असेल, तर तो शनी अतिशय खर्चदायक असतो . शनी जन्मस्थानी असेल, तर कातडीचे रोग अवश्य होतात. दुसऱ्या स्थानी असेल, तर कुटुंबात अतिशय कारण नसताना अतिशय कडाक्याचे भांडणे होतात.संपत्तीचा नाश होतो. ४ था शनी असेल, तर मित्र विरह, कोर्ट, ८ व्या शनीमुळे यात्रा, खर्च, नुकसान,अचानक एखादा रोग उद्भवतो.
या साठी शनीची साडेसाती सुरु होण्यापूर्वी आपण सतर्क रहाणे महत्वाचे आहे.शनीची साडेसाती म्हणजे (क्रमशः) भाग -१४९
शुभम भवतु …
मीन राशीच्या साडेसाती विषयी.. काळजी, स्वभाव सावधानता, आजार, व्यवसाय, आणि त्यावरील उपाय.काही अडचण, शनि विषयी काही शंका, पत्रिका व्यवस्थित असून अडचणी सुटत नसेल, तर ‘विनामूल्य मार्गदर्शन ‘ सकाळी ११ ते १ पर्यन्त तुम्ही मला 9096587586 या नंबर वर कॉल करू शकता,…हरीअनंत