शेअर बाजार ५०३ अंकाने कोसळला : सलग दुसऱ्या दिवशी नाकारात्मक बंद

विश्वनाथ बोदडे,नाशिक

0

विश्वनाथ बोदडे,नाशिक
८८८८२८०५५५ 

आंतरराष्ट्रीय स्तरावरील सकारात्मक संकेत यांच्या आधारे भारतीय शेअर बाजार सकाळी सकारात्मक उघडला ही तेजी दुपारपर्यंत कायम होती परंतु वरच्या स्तरावर मोठ्या प्रमाणात विक्री बघायला मिळाली, आज प्रामुख्याने रियालिटी ऑईल अँड गॅस पीएस यु बँकिंग क्षेत्राच्या सर्व भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नफा वसुली दिसल्यामुळे भारतीय शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल 503 अंकांनी घसरून 58 283 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी 143 अंकांनी घसरून 17 368 या पातळीवर बंद झाला तर 12 बँकिंग शेअर मिळून तयार झालेला बँक निफ्टी निर्देशांक 180 अंकांनी घसरून 36 925 या पातळीवर बंद झाला.

बाजारामध्ये सध्या दोन्ही प्रकारचे ट्रेण्ड बघायला मिळत आहेत त्याला मुख्य कारण म्हणजे बाजार सध्या जरी आंतरराष्ट्रीय स्तरावरील संकेतांचाच्या आधारे उघडत असला तरी स्थानिक स्तरावर विदेशी वित्तीय संस्थांकडून मोठ्या प्रमाणात नफा वसुली सुरू आहे त्याचबरोबर स्थानिक वित्तीय संस्था काही प्रमाणात खरेदी  सुद्धा दाखवत आहेत ,परंतु याला मुख्य कारण बाजारातील तज्ञ सांगत आहेत की, ज्या पद्धतीने क्रिप्टो करेंसी म्हणजे आभासी चलना संबंधी विविध प्रकारच्या बातम्या येत आहेत आणि ज्या पद्धतीने या आभासी चलनामध्ये मोठ्या चढ-उतार दिसत आहेत त्याचा परिणाम सहाजिकच ज्यांनी गुंतवणूक केली आहे त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या दिसत आहे याचाच परिणाम भारतीय शेअर बाजारावर सुद्धा उमटत आहेत.

कमोडिटी बाजाराचा विचार केला तर सध्या कच्चे तेल सोने व चांदी यांच्या दरात स्थिरता असली तरी जेव्हा जेव्हा शेअर बाजार खाली येतो तेव्हा तेव्हा सोने आणि चांदीचे दर वधारतात. एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून या धातूंकडे गुंतवणूकदार आपली गुंतवणूक करत असतात.

बाजारातील जाणकार सांगत आहेस की जर कमी नाही झाले तर महागाई अजून वाढू शकते त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर दिसू शकते त्यामुळे गुंतवणूकदारांनी बाजारामध्ये गुंतवणूक करताना चांगल्या प्रतीच्या समभागांमध्ये गुंतवणूक करत राहावी त्याचबरोबर येत्या काळामध्ये येऊ घातलेल्या काही राज्यांच्या निवडणुका सुद्धा बाजारासाठी दिशादर्शक ठरू शकतात.

NIFTY १७३६८ – १४३
SENSEX ५८२८३ – ५०३
BANK NIFTY ३६९२५ – १८० 

आज निफ्टी वधारलेला शेअर्स 

AXIS BANK ७०४ + २%
TECHM १६३८ + २%
SBI LIFE ११९४ + २%
WIPRO ६४७ + १%
HINDALCO ४६० + १%

आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव

BAJFINANCE ७२३० – ३%
BAJAJFINSV १७३३८ – २%
RELIANCE २४११ – २%
M&M ८४४ – २%
TATACONSUM ७५६ – २%

यु एस डी  आई एन आर $ ७५.८८७५
सोने १० ग्रॅम        ४८०८६.००
चांदी १ किलो      ६१६५६.००
क्रूड ऑईल           ५४१५.००

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.