विश्वनाथ बोदडे, नाशिक
जागतिक स्तरावरील संमिश्र संकेतांचा आधारे भारतीय शेअर बाजार सकाळी सकारात्मक उघडला, आज प्रामुख्याने बँकिंग फायनान्स ग्राहक उपयोगी वस्तू बनवणाऱ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली मागणी दिसली परंतु त्याच बरोबर आजचे सत्र अस्थिर स्वरूपात सुद्धा दिसले कारण वरच्या स्तरावर विविध क्षेत्रांच्या समभागांमध्ये नफा वसुली बघायला मिळाली याचाच परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजाराचा 30 समभागांचा निर्देशांक सेन्सेक्स 138 अंकांनी वधारून 52975 या पातळीवर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा 50 समभागांचा निर्देशांक निफ्टी बत्तीस अंकांनी वधारून 15856 या पातळीवर बंद झाला त्याच बरोबर 12 बँकिंग शेअर्स मिळून तयार झालेला बँक निफ्टी हा निर्देशांक तब्बल 357 अंकांनी वधारून 35034 या पातळीवर बंद झाला.
आज बाजारामध्ये झोमॅटो कंपनी सूचीबद्ध झाली आणि या कंपनीने पहिल्याच दिवशी भागधारकांना 60 टक्के इतका परतावा दिला.
ZOMATO. – Listing Update
IPO Price : 76.00
Open : Rs. 116.00
High : Rs. 138.00
Low : Rs. 115.00
CMP : Rs. 120.10
ही कंपनी स्टार्टर च्या माध्यमातून सुरुवात केली पहिली कंपनी नोंदणीकृत झाली आहे ह्या आयपीओ ला गुंतवणूकदारांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला होता.
सध्या बाजारामध्ये जे आयपीओ येत आहेत गुंतवणूकदारांना चांगल्याप्रकारे परतावा देत असताना दिसत आहेत त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी आपल्या गुंतवणुकीची सुरुवात आयपीओ च्या माध्यमातून केली तर नेहमीच उत्तम असते कारण या माध्यमातून आपल्याला शेअर्स मिळाले तरच आपले पैसे बँकेतून वजा होतात अथवा आपले पैसे बँकेमध्ये काही दिवस ब्लॉक राहून शेअर्स नाही मिळाले तर परत आपल्या अकाउंटवर क्रेडिट बॅलन्स दिसत असतो.
काल सेन्सेक्स 638 अंकांनी वधारला होता ,कालच्या सत्रात सर्व क्षेत्रामध्ये आपल्याला मागणी दिसली होती परंतु आज काही क्षेत्रांच्या सर्व भागांमध्ये वरच्या स्तरावर नफा वसुली दिसली.बाजारातील जाणकार सांगत आहेत की बाजार सध्या उंच स्थरावर असल्यामुळे पुढे काय दिशा असेल हे गोष्ट मान्सून, कोविडची संख्या, लसीकरण आणि कंपन्यांचे तिमाही निकाल यावर बाजाराची पुढील दिशा अवलंबून असणार आहे.
सोमवारी बाजारातील दोन दिग्गज कंपन्या रिलायन्स आणि आय सी आय सी आय बँक यांचे रिजल्ट घोषित होणार असून त्याचा परिणाम बाजारावर आपल्याला बघायला मिळेल.
कमोडिटी बाजारांमध्ये गोल्ड आणि सिल्वर या धातूंच्या किमती वरच्या स्तरावरून खाली येत आहेत तर मेटल मध्ये चांगली मागणी वाढल्यामुळे त्यांच्या किमती वधारत आहेत त्याच बरोबर क्रूडच्या किमती मागील काही दिवसांपासून स्थिर अवस्थेत दिसत आहेत.
NIFTY १५८५६ + ३२
SENSEX ५२९७५ + १३८
BANK NIFTY ३५०३४ + ३५७
आज निफ्टी वधारलेला शेअर्स
ICICI BANK ६७६ + ३%
ITC २१२ + ३%
WIPRO ५९८ + २%
SBI LIFE १०४९ + २%
TATACONSUM ७७७ + २%
आज निफ्टी मधील खाली आलेल्या शेअर्स चे भाव
TATA MOTORS २९६ – २%
GRASIM १५५० – २%
ADANIPORTS ६७९ – २%
LT १६१७ – २%
UPL ८१९ – १%
यु एस डी आय एन आर $ ७४.४७७५
सोने १० ग्रॅम ४७३७९.००
चांदी १ किलो ६७१५०.००
क्रूड ऑईल ५३६०.००
संपर्क – 8888280555