नाशिक शहरात मंगळवारी “या” भागात पाणीपुरवठा होणार नाही 

0
नाशिकनाशिक शहरात मंगळवारी काही विभागात मंगळवारी पाणी पुरवठा होणार नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य अभियांत्रिकी ( पाणी पुरवठा ) विभागा तर्फे देण्यात आली आहे. 
 
सातपूर विभागातील प्र.क्र. १० मधील समृध्द नगर, डीपी रस्त्यालगत १२०० मी. मी. व्यासाची ग्रॅव्हेटी मेन पी. एस. सी. पाईपलाईनला गळती सुरु आहे. तसेच गंगापुर डॅम, गेट जवळ १००० मी.मी. व्यासाची रायझींग मेन डी. आय. पाईपलाईनला गळती सुरु आहे. त्यामुळे सदर ठिकाणी पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मंगळवार दि. ०५/१०/२०२१ रोजी हे काम करण्यात येणार असुन सातपुर विभागातील खालील भागात मंगळवार दि. ०५/१०/२०२१ रोजीचा पुर्ण दिवस पाणी पुरवठा होणार नाही व बुधवार दि. ०६/१०/२०२१ रोजी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल याची नागरीकांनी नोंद घ्यावी व सहकार्य करावे ही विनंती करण्यात आली आहे.
 
सातपूर विभागातील खालील भाग, 
 
सातपुर विभागातील प्र.क्र. 8, 9, 10, 11, 26 व प्र. क्र.27 भागश: मधील चुंचाळे, दत्त नगर, माऊली चौक
 
नाशिक पश्चिम विभागातील खालील भाग
 
नाशिक पश्चिम विभागातील प्र.क्र. 12 मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजात नगर, समर्थ नगर वनविहार कॉलनी, लव्हाटे नगर, संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांती  नगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुन नगर, मिलिंद नगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल परिसर, तुपसाखरे लॉन्स परिसर, मातोश्री नगर, सहवास नगर, कालिका नगर, गुरीटी चौक परिसर इत्यादी.
 
नविन नाशिक विभागातील खालील भाग
 
नविन नाशिक सिडको विभागातील प्र.क्र.25(भागश:परिसर)इंद्रनगरी परिसर, प्र.क्र.28 (भागश: परिसर) खुटवड नगर, माऊली लॉन्स, वावरे नगर, अंबड गांव, महालक्ष्मी नगर, प्र.क्र 27 (भागश:परिसर) चुंचाळे घरकुल योजना
    
तरी याची नागरिकांनी नोंद घ्यावी व महानगरपालिकेस सहकार्य करावे. असे आवाहन कार्यकारी अभियंता साआअवि (पापु) नाशिक महानगरपालिका नाशिक यांच्या तर्फे करण्यात आले आहे. 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.