नाशिक जिल्ह्यातील पहिली ते नववीच्या शाळा सोमवार पासून बंद : छगन भुजबळ

बाजारपेठेसह 'या' ठिकाणी आता नो व्हॅक्सीन नो एंट्री

2

नाशिक – कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता येत्या सोमवार पासून पहिली ते नववीच्या शाळा ३१ जानेवारी पर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला असून या शाळा आता ऑनलाईन सुरु होणार आहेत.परंतु १० वी ते १२ वी चे वर्ग मात्र नियमित सुरु राहणार आहेत.अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.जिल्ह्यातील कोरोना आढावा बैठकी नंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, जिल्ह्यातील १० वी व १२ वी चे वर्ग वगळता बंद करण्यात आलेल्या शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरु ठेवण्यास हरकत नाही. तसेच ज्या नागरिकांचा लसीकरणाचा दुसरा डोस बाकी आहे. तो वेळेत घ्यावा यासाठी प्रशासकीय यंत्रणामार्फत आवश्यक ते नियोजन करण्यात यावे. त्याचप्रमाणे गेल्या आठ दिवसात वाढलेली रुग्णसंख्या पाहता लग्नसमारंभ साधेपणाने करण्यात यावे. तसेच समांरभामध्ये ५० पेक्षा अधिक व्यक्ती आढळल्यास महसूल व पोलीस यंत्रणा यांच्यामार्फत संयुक्तपणे संबंधित आयोजकांवर कडक कारवाई करण्यात यावी.

ते पुढे म्हणाले सर्व सरकारी, निम सरकारी कार्यालय हॉटेल मॉल सह बाजारपेठेत आता नो व्हॅक्सीन नो एंट्री चा नियम कठोर करण्यात आला आहे. ज्यांचा दुसरा डोस बाकी असेल त्यांनी तो तातडीने घ्यावा. नागरीकांना जर व्हॅक्सीन घेतले नसेल यापुढे नो व्हॅक्सीन नो रेशन असा कटू निर्णय घ्यावा लागेल त्यामुळे नागरीकांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

प्रशासन अनेक दिवसापासून नागरीक आणि बाजार पेठेतील व्यापाऱ्यांनी नियम पाळण्याचे आवाहन करत आहे. परंतु बाजारपेठेत अजूनही मोठ्याप्रमाणावर गर्दी दिसत आहे.नागरीकांनी नियमांचे पालन न केल्यास काही दिवसानंतर बाजारपेठा हि बंद करण्याची वेळ आणू नका असा इशारा छगन भुजबळ यांनी दिला.

कोरोनाची वाढती रुग्णसंख्या व तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व यात्रांवर बंदी राहिल. तसेच धार्मिक स्थळांमध्ये कोरोनाच्या सर्वं नियमांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी तेथील पुजारी, विश्वस्त यांची असेल. सर्व शासकीय व खासगी आस्थापनांमध्ये लसीकरणाशिवाय प्रवेश नाही, याबाबतची अंमलबजावणी अधिक काटेकोरपणे करण्यात यावी. तसेच सर्व नागरिकांनी तिसऱ्या लाटेचा धोका वाढू नये यासाठी स्वत: सोबतच आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन, शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

जिल्ह्याची कोरोना सद्यस्थितीची माहिती देतांना जिल्हाधिकारी सूरज मांढरे म्हणाले की, वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्यात येत आहे. यामध्ये दरदिवसाला साधारण ३० हजार नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे. तसेच साधारण 9 लाख लस जिल्ह्यात शिल्लक आहेत. त्याचप्रमाणे मालेगावमध्ये कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. आजच्या स्थितीला मालेगांवमध्ये ७० टक्के नागरिकांचा पहिला डोस तर ४२ टक्के नागकिांचा लसीकरणाचा दुसरा डोस पूर्ण झालेला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिंती करण्यात आली असून, पुरेश्या प्रमाणात बेड्स व औषधसाठा उपलब्ध आहे. तसेच जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मालेगावमधील कोरोना रुग्णांची  संख्या अत्यल्प असल्याने तेथील परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत अभ्यास गट गठित करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती  जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी यावेळी दिली.

बैठकीदरम्यान महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री श्री. भुजबळ यांना सादर केली.

याबैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक्त दिपक पाण्‍डेय, महानगरपालिकेचे आयुक्त कैलास जाधव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक पी. एस. गांडाळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिकर, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. Jyoti Chavan says

    आता मुलांच्या शिक्षणाशीखेळु नका, फक्त राजकारण चालले आहे, जनतेने लक्षात घेतले पाहिजे, जशी जशी प्रगती होत चालली तस देशाला मागे आणायच काम चालले आहे, जरा लोकांना सवय लागली पाहीजे रोगांशी लढा देण्याची, आणि या आधी किती भयंकर आजार होऊन गेले आणि अजुनही आहे आणि मग कोरोनालाडोक्यावर का फसवल, न्यूज वाल्याना सांगा लोकांना घाबरवु नका, शेतकर्‍यांच्या पोटावर पाय देऊ नका, आणि न्युज वर आकडेवारी सांगत फिरता, दुसर्‍या बातम्या नाही का काही,

  2. Bhausaheb Ugale says

    Bhausaheb Ugale

कॉपी करू नका.