आजचे राशिभविष्य बुधवार,२४ जून २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक(Marathi Rashi Bhavishya)
निज ज्येष्ठ शुक्ल दशमी / संध्याकाळी ६.४१ नंतर एकादशी. ग्रीष्म ऋतू.
पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
⏰ राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज उत्तम दिवस आहे.”
🌙 नक्षत्र – चित्रा / दुपारी १.५९ नंतर स्वाती.
🌟 आज जन्मलेल्या बाळाची राशी – तुळ. (सकाळी १०.२३ पर्यंत परीघ योग)
🔭 रवी त्रिकोण चंद्र.
🔭 चंद्र केंद्र गुरू.

🪔 राशिभविष्य -(Marathi Rashi Bhavishya)

🐏 मेष:-
भाग्याची उत्तम साथ लाभेल. रवी-चंद्र त्रिकोण योगामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना यशस्वी होतील. प्रवासातून लाभ संभवतो. मित्रांचे सहकार्य लाभेल.

🐂 वृषभ:-
आर्थिक व्यवहारात यश मिळेल. कुटुंबीयांचे सहकार्य लाभेल. जुनी रखडलेली कामे पूर्ण होतील. आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणुकीसाठी दिवस अनुकूल राहील.

👬 मिथुन:-
व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. वरिष्ठांकडून कौतुक होईल. चंद्र-गुरूच्या प्रभावामुळे निर्णयक्षमता वाढेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान मिळेल.

🦀 कर्क:-
भाग्यस्थान अनुकूल असल्याने महत्त्वाची कामे मार्गी लागतील. धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. प्रवास लाभदायक ठरेल.

🦁 सिंह:-
आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा. अनपेक्षित खर्च संभवतात. गुप्त लाभाची शक्यता आहे. मानसिक स्थैर्य राखा. महत्त्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्या.

👧 कन्या:-
वैवाहिक आणि भागीदारीच्या क्षेत्रात यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. नवीन करार लाभदायक ठरतील. सामाजिक संबंध दृढ होतील.

⚖️ तुळ:-
राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पडेल. चंद्र-गुरू केंद्र योगामुळे मान-सन्मान वाढेल. नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी दिवस अत्यंत अनुकूल आहे.

🦂 वृश्चिक:-
खर्च वाढण्याची शक्यता आहे. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. काही जुन्या गोष्टींचा विचार मनात येईल. संयम आणि सकारात्मकता लाभदायक ठरेल.

🏹 धनु:-
मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत. सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रात नवीन संधी मिळतील. एखादी महत्त्वाची इच्छा पूर्ण होऊ शकते.

🐐 मकर:-
कार्यक्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत. वरिष्ठांची कृपा लाभेल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. प्रतिष्ठा आणि जबाबदाऱ्या वाढतील.

🏺 कुंभ:-
भाग्याची साथ लाभेल. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सहभाग वाढेल. नवीन ओळखी भविष्यात लाभदायक ठरतील.

🐟 मीन:-
आर्थिक व्यवहार जपून करा. अचानक खर्च होण्याची शक्यता आहे. संशोधन आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना लाभ होईल. मानसिक शांतता राखण्याचा प्रयत्न करा.

(कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या. कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – .ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक 8087520521)

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!