सकल मराठा सोयरीक ग्रुप च्या राज्यस्तरीय पुरस्कारांसाठी १९ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन 

0

नाशिक-  विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करण्यास गुणी जणांना प्रेरणा मिळावी यासाठी सकल मराठा सोयरीक ग्रुप विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा   सन्मान करण्यात येतो. तसेच या माध्यमातून एकजूट करत एक अतूट नाती निर्माण करण्याचा या पुरस्कार वितरणाचा उद्देश आहे. राज्यभरातील विविध क्षेत्रातील गुणवंत मान्यवरांचा सकल मराठा सोयरीक ग्रुपचे राज्याध्यक्षा ,रजनीताई गोंदकर व यांच्या मार्गदर्शनाखाली व सोयरीक ग्रृप चे संस्थापक जयकिसन वाघपाटील यांच्या पुढाकाराने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण  सकल मराठा सोयरीक ग्रुपच्या वतीने प्रतिवर्षी विविध क्षेत्रातील कर्तृत्वसंपन्न मान्यवरांचा गौरव करण्यात येतो.

प्रतिवर्षीप्रमाणे याहीवर्षी शिक्षण,समाजसेवा,साहित्य, कला, क्रीडा उद्योग, कृषी, ग्रामविकास, व्यवसायिक इत्यादी २५ क्षेत्रातील पुरस्कार तसेच  सामाजिक, सहकार, वैद्यकीय,पर्यावरण उद्योग, प्रशासकीय आदी क्षेत्रात स्पृहणीय कामगिरी केलेल्या महिला व पुरुष तसेच संस्था,तसेच समाजासाठी केलेल्या योगदानाची दखल घेऊन यांच्या कार्याचा गौरव व्हावा या उद्देशाने अप्रतिम सन्मानचिन्ह मानपत्र, शाल, श्रीफळ, गौरव देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे तरी इच्छुकांनी आपली माहिती https://forms.gle/GanT2cMtYDNmLptN7 या लिंकव्दारे आपले नाव पत्ता सविस्तर माहिती भरुन द्यावी.अशी माहिती  सकल मराठा सोयरीक ग्रुपचे  व पुरस्कार वितरण सोहळ्याचे प्रमुख सदस्य अनिल गडाख, स्वागताध्यक्ष हरीभाऊ जगताप, लक्ष्मण मडके, रघुनाथ झावरे,विनोद वाडेकर,राजेश सरमाने,बाळासाहेब वाकचौरे ,मायाताई जगताप, संपदा ससे,धनंजय सांबारे यांनी दिली आहे.

विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करण्यास गुणी जणांना प्रेरणा मिळावी यासाठी त्यांचा सन्मान करण्यात येतो. तसेच या माध्यमातून एकजूट करत एक अतूट नाती निर्माण करण्याचा या पुरस्कार वितरणाचा उद्देश आहे. राज्यभरातील सर्व क्षेत्रातील असंख्य मान्यवर या सोयरीकच्या सामाजिक चळवळीत जोडले गेले असून इच्छूकांनी नामांकन प्रस्ताव सादर करावा तसेच सकल मराठा सोयरीक ग्रुपचे सर्व जिल्हाध्यक्ष व प्रमुख पदाधिकारी यांचे कडे मागणी केल्यासही सदर नामांकन लिंक मिळू शकेल परिपूर्ण माहितीसह नामांकन फार्म पाठविण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०२२ पर्यंत असणार आहेत त्या नंतर  अंतिम निवड व कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून अधिक माहितीसाठी 9604045095 व 7276135095या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा  असे आवाहन करण्यात आले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.