मुंबई : आता सुरू होणार खरा खेळ !बिग बॉस घरातील सदस्यांना नवनवे टास्क देत असतात. आणि टास्कमध्ये काही सदस्य बाजी मारतात तर काहींनाच्या हाती हार येते. बिग बॉस मराठी सिझन तिसराचा नॉमिनेशन टास्क पार पडल्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणर आहे एक नवा टास्क “चिऊ ताई चिऊ ताई दार उघड”. आता हा टास्क नक्की काय असणार आहे ? या टास्क मध्ये नक्की काय घडेल ? काय चॅलेंज दिले जाणार आहे ? कोण बाजी मारेल ? काय स्वरूप असेल या टास्कचं ? हे सगळं आजच्या भागामध्ये कळणार असून नुकत्याच बाहेर आलेल्या प्रोमोमध्ये असे दिसत आहे घरातील पुरूश मंडळी महिला सदस्यांना काहीतरी विनवणी करण्याचा प्रयत्न करत आहेत.
यामध्ये प्रोमोमध्ये आविष्कार मीराला सांगताना दिसत आहे, “आम्ही तुमची सेवा करू इच्छितो, त्यावर मीराच म्हणणं पडलं “तुम्ही ऐकतचं नाही ना माझं”. जय देखील सांगताना दिसला मला निवडा, विशाल, विकास पाटील देखील, अक्षय वाघमारे, उत्कर्ष शिंदे, संतोष (दादुस) सगळेच पुरुष मंडळी घरातील स्त्रियांना आपला मुद्दा पटवून देताना दिसत आहेत. बघूया कोण बाजी मारेल या टास्कमध्ये बिग बॉस मराठीच्या आजच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.
सोनाली पाटील झाली भावुक : मीरा आणि स्नेहामध्ये पुन्हाएकदा वादाची ठिणगी
बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आपल्या जवळच्या माणसांची, घरच्यांची आठवण येणं अगदी सहाजिक आहे. सोनाली पाटील आज शिवलीला यांच्याशी बोलताना, आठवणी सांगताना भावुक होताना दिसणार आहे. सोनाली शिवलीला तिच्या वडिलांबाबतीत काही आठवणी सांगणार आहे. सोनाली म्हणाली, “माझा त्यांच्यासोबतचा शेवटचा कार्यक्रम आठवला”. माझी मालिका सुरू असतानाच पप्पा वारले. त्यांनी माझी मालिका वैजू बघितलीच नाही. कुठलचं कारण नाही, अचानक एखादा माणूस तुम्हाला सोडून जातो… त्याचंच वाईट वाटतं. शिवलीला यांनी तिची समजूत काढली म्हणाल्या “म्हणजे तुमचा प्रवास सुरू झालेलाच नाही बघितला. तुला असं वाटत आहे त्यांनी पाहिलं नाही, पण तुला हे देखील माहिती आहे की ते बघत आहेत… आणि ते आता जिथे असतील ते खुश असतील, आता तू बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आहेस. तू वाईट वाटून नको घेऊस, तुला अभिमान वाटला पाहिजे.
पुन्हाएकदा कालच्या मुद्द्यावरून मीरा आणि स्नेहामध्ये मोठ भांडण होणार आहे. मीराला नक्की कोणत्या गोष्टीचा राग आला आहे ? त्यामध्ये नक्की घडणार ? कोणाची बाजू कोण घेणार ? स्नेहा तिचा मुद्दा पटवून देऊ शकेल ? बघा आजच्या बिग बॉस मराठीच्या भागामध्ये रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.