गंगापूर धरणातून १५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग : गोदावरीला येणार मोठा पूर

0

नाशिक – काल पासूनच नाशिक जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.संततधार पावसामुळे गंगापूर धरण १०० टक्के भरले असून आज दुपारी बारा वाजेपर्यंत गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. आज सकाळी १० वाजता धरणातून १० हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात आला असून दुपारी १२ वाजे पर्यंत गंगापूरमधून १५ हजार क्युसेकपर्यंत विसर्ग केला जाणार असल्याने गोदा काठच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील २४ तास मुसळधार पावसाचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे.

जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता सागर शिंदे यांच्याशी जिल्हाधिकारी मांढरे यांनी चर्चा केली. त्यांच्या चर्चेनुसार, आज दुपारी १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग केला जाणार आहे. १५ हजार क्युसेक्स पेक्षा अधिक विसर्ग होण्याची शक्यता आहे.नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने जिल्हाधिकारी मांढरे यांनी एक एसओपी (SOP) तयार केली असून यामध्ये विभागनिहाय जबाबदार्यांचे वाटप करण्यात आले आहे. गंगापूर धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गाचे नियोजन गंगापूर धरण विसर्ग सकाळी ८ वाजता एकूण ५००० क्युसेक करण्यात येणार आहेगंगापूर धरण विसर्ग सकाळी ९ वाजता एकूण ७००० क्युसेक करण्यात येईल.गंगापूर धरण विसर्ग सकाळी १० वाजता एकूण १०००० क्युसेक करण्यात येणार आहे

नांदूरमध्यमेश्वर धरणातून विसर्ग

नांदूरमध्यमेश्वर धरणातून सकाळी १० वाजता ३५ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून दुपारी ११ वाजता त्यात वाढ करून तो ४५ हजार क्युसेकने करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाप्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे.

जायकवाडी धरण ९२ टक्के भरले

संततधार पावसामुळे जायकवाडी धरण ९२ टक्के भरलं असून धरणात आणखीही आवक सुरुच आहे. जर पाण्याची अशीच आवक सुरु राहिली तर अवघ्या काही तासांत मराठवाडा धरण १०० टक्के भरणार आहे. त्यामुळे जायकवाडी धरणाचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. भरीस भर म्हणजे आजही मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट देण्यात आला आहे.

काय आहे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा संदेश

श्री सागर शिंदे कार्यकारी अभियंता नाशिक यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार आज १२ वाजेपर्यंत गंगापूर धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग होणार असून तो १५००० क्युसेक्स पेक्षा अधिक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीच्या पाण्यात भरीव वाढ होणार असल्याने या SOP प्रमाणे सर्व संबंधित विभागानी योग्य ती कार्यवाही करावी अशा सूचना दिल्या आहेत.

नदी लगतच्या नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. अन्य नागरिकांनी नदीजवळ पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. आजही अतिवृष्टीचा इशारा विचारात घेता नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये.
– सूरज मांढरे,
जिल्हाधिकारी नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.