जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यासह प्रशाकीय अधिकाऱ्यांनी घेतला बुस्टर डोस

एकाच वेळी बूस्टर डोस घेऊन अधिकाऱ्यांनी दाखवला आदर्श

0

नाशिक- देशभरात आज पासून बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली आहे.आज नाशिक जिल्ह्यातील फ्रन्टलाइन अधिकारी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड नाशिक महानगरपालिका आयुक्त श्री कैलास जाधव नाशिक जिल्हा सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस श्री सचिन पाटील यांनी covid-19 लसीचा बूस्टर डोस घेऊन नाशिक जिल्ह्यातील जनतेसमोर एक आदर्श ठेवलाआहे.

सर्व विभाग एकत्रित येऊन covid-19 साथरोगा विरुद्ध एकत्रित लढत आहेत तिसरी लाट रोखण्यासाठी लसीकरण करून आम्ही सज्ज आहोत हेच त्यांनी कृतीतून दाखवून दिले आज जिल्हा रुग्णालय येथील लसीकरण केंद्रात सर्वजण सकाळी दहा वाजता उपस्थित राहून सर्वांनी बूस्टर डोस घेतला.

याप्रसंगी आरोग्य विभागाचे विभागीय उपसंचालक नाशिक मंडळ नाशिक डॉ पु ना गांडाळ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कपिल आहेर जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ कैलास भोये अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ के आर श्रीवास, डॉ शरद पाटील डॉ मनोज गाडेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते याप्रसंगी जिल्हाधिकारी यांनी कोणती लस आपण घेणार आहोत याबद्दल माहिती घेतली यापूर्वी त्यांनी जी लस घेतली होती त्याच लसीचा बूस्टर डोस आज त्यांना देण्यात आला.

याप्रसंगी विभागीय आयुक्त श्री राधाकृष्ण गमे यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन कर्मचारी यांनी बूस्टर डोस चा लाभ घ्यावा तसेच 60 वर्षावरील व्यक्तींनी सुद्धा या मोहिमेचा लाभ घ्यावा व आपला जिल्हाचे शंभर टक्के लसीकरण होईल यासाठी सर्वांनी आग्रहाने प्रयत्न करावे असे आवाहन केले लसीकरण सत्राचे आयोजन बघून त्यांनी समाधान व्यक्त केले.

याप्रसंगी मा जिल्हाधिकारी श्री सुरज मांढरे व मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांनी ग्रामीण भागात काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी व फ्रन्टलाइन वर्कर यांनी आपले बूस्टर डोस चे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे असे आवाहन याप्रसंगी केले कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री सुरज हरगुडे, सिव्हिल हॉस्पिटल येथील स्टाफ यांनी विशेष प्रयत्न केले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.