नाशिक,दि,३० नोव्हेंबर २०२४ – (Nashik Temperature)आठवडाभरापासून कमी होणाऱ्या तापमानाने आज शनिवारी हंगामातील ८.९ अंश ही नीचांकी पातळी गाठली. तर निफाडच्या कृषी विज्ञान केंद्रात ७.० अंश तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबरच्या अखेरीस तापमान या पातळीवर आल्याने सर्वत्र सुखद गारव्याची अनुभूती मिळत आहे.
कडकडीत उन्हाळा, मुसळधार पावसानंतर नाशिकची वाटचाल आता वेगाने कडाक्याच्या थंडीच्या दिशेने सुरू झाली आहे. एरवी दिवाळीनंतर वातावरणात गारवा जाणवू लागतो. परंतु यावर्षी दिवाळी नंतर गारठा जाणवू लागला .नोव्हेंबरच्या मध्यावर तापमान १४.६ अंशावर होते. ११ दिवसांत तापमान ७ अंशाने खाली आले आहे. मागील आठवड्यात गुरुवार आणि शुक्रवार असे सलग दोन दिवस तापमान १०.५ अंशावर होते. शनिवारची सकाळ नाशिकला थंड करणारी ठरली. या दिवशी शहरात ८.९ अंश तर, निफाडमध्ये ७ अंश तापमानाची नोंद झाली होती.या हंगामातील हे नीचांकी तापमान आहे. शहर आणि ग्रामीण भागात कमालीचा गारवा जाणवत आहे. गारठ्यामुळे उबदार कपडे बाहेर पडू लागले आहेत. ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवते.
निफाडचा पारा सात अंशावर :द्राक्ष बागाईतदारांचि चिंता वाढली
निफाड तालुक्यात थंडीचा मुक्काम वाढला आहे. शनिवारी सकाळी कुंदेवाडी येथील कृषि संशोधन केंद्रात पारा सात अंशावर घसरल्याची नोंद झाली आहेनिफाड तालुक्यात दरवर्षी पारा घसरत असतो चालु हंगामात सात अंशावर पारा घसरण्याची निचांकी नोंद झाली आहे त्यामुळे तयार होत असलेल्या द्राक्षमालाची फुगवण थांबणार आहे तर परिपक्व द्राक्षमालाला कडाक्याच्या थंडीमुळे तडे जाण्याचा धोका आहे घसरते तपमान हे द्राक्ष बागाईतदारांची चिंता वाढवत आहे कडाक्याच्या थंडीपासुन द्राक्ष मालाची निगा राखण्यासाठी आवश्यकतेनुसार द्राक्ष बागाईतदारांनी पहाटेच्या वेळी ठिबक सिंचनने पाणी द्यावे शिवाय द्राक्ष बागांत शेकोटी पेटवुन धुराद्वारे उष्णता निर्माण करावी अशी महत्वपूर्ण काळजी द्राक्ष बागाईतदारांनी या नैसर्गिक संकटापासुन द्राक्षमाल वाचविण्यासाठी घ्यावी असे अवाहन महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागाईतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले यांनी केले आहे