आरोग्यासह बहुपर्यटन हबकडे नाशिकची वाटचाल : पालकमंत्री छगन भुजबळ

0


नाशिक – 
कोरोनासह भविष्यातील इतर सर्व आजांरावर उपचार होण्यासाठी नाशिक शहरात वैद्यकीय  पर्यटनाचे हब तयार करण्याचा मानस आहे. नाशिकमध्ये येणाऱ्या माणसाला पर्यटनाकरिता पर्याय उलपब्ध व्हावे यासाठी नाशिक शहराची आरोग्यासह बहुपर्यटन हबकडे वाटचाल होत आहे, असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  केले आहे.

शालीमार येथील विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय  येथील नवीन इमारतीचा बांधकाम भूमीपूजन सोहळा पालकमंत्री छगन भुजबळ यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री आ.जयकुमार रावल,आमदार देवयानी फरांदे,महापौर सतिष कुलकर्णी ,उपमहापौर भिकुबाई बागुल, कार्यकारी अभियंता सिध्दार्थ तांबे आदी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की , उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना उत्तम दर्जाची आरोग्य सुविधा देण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करण्यात येत असून सर्व सुविधांनी युक्त असे रुग्णालये नाशिक शहरात उभे राहत आहेत. तसेच आज विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात पेडीयाट्रिक, न्युरोसर्जरी, प्लास्टीक सर्जरी , अर्भक अति दक्षता विभाग असे 105 खाटांचे नवीन इमारतचे भूमिपूजन पार पडले असून लवकरच हे रुग्णालय नागरिकांचे सेवेसाठी सुसज्ज होणार असल्याचेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

उत्तर महाराष्ट्राची प्रमुख राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या नाशिक शहराचा विकास आरोग्य, पर्यटन आणि शैक्षणिक या तिन्ही घटकांवर करण्यात येणार आहे. जेणेकरुन उत्तर महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाला याचा लाभ घेता येईल.  तसेच कारोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वच स्तरावरुन करण्यात येणाऱ्या प्रयत्नांना यश मिळतांना दिसत आहे. त्यामुळे यंदा दिवाळी आनंदात साजरी करत करतांना अर्थ,आरोग्य व सामाजिक चक्र सुरळीत चालु राहण्यासाठी सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय  येथील नवीन इमारतीसाठी एकूण २० कोटी ४९ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या नवीन इमारतीमध्ये ३० खाटांचे पेडीयाट्रिक, ३० खाटांचे न्युरोसर्जरी, ३० खाटांचे प्लास्टीक सर्जरी विभागासाठी  , १५ अर्भक अति दक्षता विभागासाठी असे एकूण १०५ खाटांचे सुपर स्पेशालिस्ट रुग्णालय तयार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार देवयानी फरांदे यांनी आल्या प्रास्तविकात दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.