राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा.सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण

0

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे व यांचे पती सदानंद सुळे या दोघांचेही कोरोनाची लागण झाली आहे. दोघांचेही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. सुप्रिया सुळे यांनी थोड्यावेळापूर्वी ट्विटरवरून ही माहिती दिली. आमच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोना तपासणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

सुप्रिया सुळे यांनी काय ट्विट केले ?

खासदार सुप्रिया सुळे यांनी आज २९ डिसेंबर रोजी त्यांच्या ट्विटरवरून दुपारी ही माहिती दिली. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले,
मी आणि सदानंद, आम्हा दोघांचीही कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. काळजी करण्याचे कारण नाही पण आमच्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करुन घ्यावी,ही नम्र विनंती. काळजी घ्या.

काल (दि 28 डिसेंबर) रोजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी देखील ट्विट करून ही माहिती दिली. तसेच माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना तपासणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. वर्षा गायकवाड या हिवाळी अधिवेशनात उपस्थित होत्या. त्यामुळे इतर मंत्र्यांनाही बाधा होते की काय ही चिंता वाढली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.