नाशिक जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या १० हजार ९८२ : जिल्हाधिकाऱ्यांनी दिला ‘हा’ इशारा

0

नाशिक- नाशिक जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत प्रचंड वाढ बघायला मिळते आहे. कल नाशिक जिल्ह्यात ३०३५ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी कठोर निर्बंध लावण्याचे संकेत दिले आहेत

काय म्हणाले जिल्हाधिकारी

“कोविड विषयक नियमांचे पालन न केल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते हे सर्वांनी लक्षात घेण्याची गरज आहे. उपचाराची व्यवस्था निर्माण करण्यात प्रशासन कोणतीही कसर ठेवत नसताना नागरिकांनी कोविड नियमांचे पालन करून आपली जबाबदारी सुद्धा पार पाडावी असे आवाहन पुन्हा करण्यात येत आहे. अन्यथा आगामी काळात निर्बंध अधिक कठोर करण्याशिवाय गत्यंतर राहणार नाही याची नोंद घ्यावी’.

सद्यस्थितीत १० हजार ९८२ रुग्णांवर उपचार सुरू

जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख १२ हजार ०३८ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत १० हजार ९८२ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७६८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २८७, बागलाण ३६, चांदवड २२, देवळा १९, दिंडोरी ३३७, इगतपुरी ८३, कळवण ५९, मालेगाव ५५, नांदगाव १२९, निफाड ६२५, पेठ ३२, सिन्नर २७९, सुरगाणा ३६, त्र्यंबकेश्वर २४, येवला ३३ असे एकूण २ हजार ५६ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ८ हजार ३६९, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात २०३ तर जिल्ह्याबाहेरील ३५४ रुग्ण असून असे एकूण १० हजार ९८२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख ३१ हजार ७८८ रुग्ण आढळून आले आहेत.

नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २२०, बागलाण ३५, चांदवड ३५, देवळा २८, दिंडोरी १०८, इगतपुरी १११, कळवण ३२, मालेगाव ३७, नांदगाव ८०, निफाड २५०, पेठ १३, सिन्नर १२०, सुरगाणा ०६, त्र्यंबकेश्वर ४५, येवला ६५ असे एकूण १ हजार १८५ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.१२ टक्के, नाशिक शहरात ९४.९५ टक्के, मालेगाव मध्ये ९५.६९ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९२.९८ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४३ इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ४ हजार २५२ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ३२, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७६८ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

लक्षणीय :

४ लाख ३१ हजार ७८८ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख १२ हजार ०३८ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.

सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले १० हजार ९८२ पॉझिटिव्ह रुग्ण.

जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९५.४३ टक्के.

(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.