दर्श अमावस्या ,प्रारंभ सकाळी १०.२९
राहुकाळ – दुपारी ४.३१ ते ५.५३
नक्षत्र: विशाखा
आज जन्मलेल्या बाळाची राशी- वृश्चिक
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) अचानक एखादा खर्च उदभवू शकतो.चुकीचे निर्णय घेतले जातील. बुद्धिभेद टाळा.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ,वा,वी,वू,वे,वो) व्यव स्थानी हर्षल आहे. संकटाची नांदी आहे. मान अपमान बाजूला ठेवा. नात्यात वाद विवाद नकोत.
मिथुन:– (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) हरवलेले सापडले अशी अवस्था होईल. रखडलेली खरेदी आज पूर्ण कराल. पैसे हाताळताना काळजी घ्या.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) मेजवानीचे योग आहेत. सहलीचे बेत आखाल मात्र आधी नोकरीच्या ठिकाणी खात्री करून घ्या. नियोजन बदलू शकते.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) प्रतिकूल दिवस आहे. पाप पुण्याचा विचार करावा लागेल. पर्यटन करताना काळजी घ्या. त्रास संभवतो.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) अनुकूल दिवस आहे. लाभतील चंद्र तुमचा उत्साह वाढवेन. मात्र अति पैशांचा हव्यास टाळा. विंचू – काट्याचे भय आहे.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) नोकरीच्या ठिकाणी वैयक्तिक संबंध आणू नका. अधिकाराचा गैरवापर टाळा. प्रेमात फसवणूक होऊ शकते.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नेतृत्व गुण चमकतील. स्तुती होईल मात्र प्रवासात त्रास होऊ शकतो. वाहन जपून चालवा.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) प्रतिकूल ग्रहमान आहे. पंचमात हर्षल आहे. अष्टमस्थानी चंद्र आहे. विश्रांती घेणे उत्तम. मोठी जोखीम नको.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) साधी राहणी आवश्यक आहे. मत्सर त्रास जाणवेल. मातेची चिंता वाटेल. हृदयाची काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) मानसिक अस्वस्थता जाणवेल. ज्ञानधारणा आणि ध्यान धारणा आवश्यक आहे. चांगले कर्म करा.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) राजनीती टाळा. काळजी घ्या. भोजनातून त्रासदायक ग्रहण केले जाऊ शकते. विचारपूर्वक निर्णय घ्या