अपर्णाच्या बाबतीत संजू घेणार मोठा निर्णय

0

मुंबई : राजा रानीची गं जोडी मालिकेमध्ये अखेर तो क्षण आला ज्याची वाट आपण सगळेच आतुरतेने बघत होतो. बर्‍याच महिन्यापासून ढाले पाटीलांच्या घरामध्ये अपर्णाने संजू – रणजीतच्या विरोधात कट कारस्थानं करून सगळ्यांची मनं जिंकली होती. अपर्णा – राजश्रीचे कारस्थान कधी घरच्यांच्या समोर येईल हा प्रश्न बर्‍याचडा मनात येऊन गेला. सुजित अपर्णाचा खरा स्वभाव कसा आहे आणि तिला नक्की काय हवं आहे हे सुजीतच्या खूप आधीच लक्षात आलं होतं. विश्वात घेऊन त्याने ते संजूला देखील सांगितले होते. संजूने सुजितला दिलेले वचन पाळले. सुजितला अपर्णासोबतच्या जबरदस्तीच्या नात्यातून संजू कायमचे सोडवणार आहे.

येत्या आठवड्यातमध्ये अपर्णाचा पर्दाफाश होणार आहे. आजवर अपर्णाने जे काही खोटं सांगितले, खोट वागली आहे ते आता संजू सगळ्यांच्या समोर आणणार आहे. म्हणतात ना “खोटं जास्त दिवस लपून राहत नाही” सत्याचा विजय अखेर होतोचं. अपर्णाचं सत्य समोर आणणल्यानंतर संजू अपर्णाची ढालेपाटलांच्या घरातून हकालपटी करणार आहे. हे देखील संकट राजा – रानीने मिळून दूर केलं. आता पुढे काय होणार?

ढालेपाटीलांच्या घरामध्ये श्रावणातील पूजा ठेवण्यात येणार आहे. त्या पूजेमध्ये अपर्णा आणि सुजीतने बसावे अशी कुसुमावती यांची इच्छा आहे. संजू आणि रणजीत मिळून अपर्णाचं सत्य ढालेपाटील कुटुंबासमोर आणणार आहेत. पूजेच्याचं दिवशी संजू सगळ्यांना सांगणार की, अपर्णा कधी गरोदर नव्हती तिने बाळ पडण्याच नाटक केलं. हे कळल्यानंतर आईसाहेबांना आणि घरच्यांना खूप मोठा धक्का बसतो. ढालेपाटीलांच्या घरातून अपर्णाची हकालपटी झाल्यानंतर कुसुमावती आणि संजूचं नातं सुधारेल ? पुढे मालिकेमध्ये काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी बघा राजा रानीची गं जोडी सोम ते रवि संध्या ७.०० वा. कलर्स मराठीवर रसिकांना बघायला मिळणार आहे. .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.