मालेगाव (प्रतिनिधी) – त्रिपुरा येथील घडलेल्या घटने नंतर आज शुक्रवारी मालेगाव बंद पुकारण्यात आला.या बंदला दुपारनंतर काही समाजकंटक तरुणांच्या टोळक्याने मुक्त गोंधळ घालत हिंसक वळण दिले.मेडीकला शॉप,काही दुकाने,एस्टी स्थानक, शॉपींग सेंटर,पानटपऱ्यांसह इतर भागात तुफान दगडफेक केली असल्याचे वृत्त जरी असले तरी आता मालेगाव येथील परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. त्या ठिकाणी दंडाधिकारी व वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित आहेत. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व संयम बाळगावा.असे आवाहन जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.
दरम्यान रात्री तणावपूर्ण शांतता होती.बाहेरगावाहून पोलिसांचा जादा बंदोबस्त मागविण्यात आला असून खबरदारी म्हणून पोलिसांनी मोसम नदीवरील पूल,व पूर्व, पश्चिम भागातील संपर्क,वाहतुक रोखली होती.मुस्लिम धर्मगुरु, समाजसेवक,नेते शांततेचे आवाहन करीत फिरत होते.प्रार्थना स्थळांमधूनही अफवांवर विश्वास ठेवू नका,शांतता ठेवा असे आवाहन करीत होते.अप्पर पोलिस अधीक्षक चंद्रकांत खांडवी,डिवायएसपी लता दोंदे, तहसिलदार राजपूत,सर्व पोलीस स्थानकांचे अधिकारी , कर्मचारी,राज्य राखीव दलाच्या कंपन्या परिस्थितीवर लक्ष ठेवून होते.
त्रिपुरातिला घटनेच्या निषेधार्थ आज रजा अकादमी तसेच इतर मुस्लीम संघटनांकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.त्यात मालेगाव ने सहभाग घेतला होता.
काही तरूणांनी मोर्चे काढत व्यापारी संकुलातील उघडी दुकाने दगडफेक करीत बंद करण्याचा प्रयत्न केला.यावेळ दाखल झालेल्य शीघ्र कृती दलाच्या जवानांसह वाहनांवर देखील दगडफेक संतप्त जमावातर्फे सुरू करण्यात आल्याने पोलिसांनी लाठीमार करत जमावास पिटाळून लावलण्याचा प्रयत्न केला.या प्रकारांमुळे शहरात तणावाचे वातावरण पसरून भितीने दुकाने बंद करण्यात आली. बंद दुपारपर्यंत शांततेत पार पडत असतांना अचानक काही भागातून तरूणांचे मोर्चे किदवाईरोडवरील टॉवरजवळ येवून नारेबाजी करु लागले.
यावेळी लोखंडी जाळ्या लावून पोलिसांनी नाकेबंदी केली असता या समाजकंटक तरूणांनी जुना आग्रारोडवर जावून व्यापारी दुकानांकडे चाल करत दगडफेक सुरू केल्याने, दुकानदार व्यापार्यांमध्ये एकच घबराट पसरून दुकाने बंद झाली होती.परंतु आता या सर्वभागातील परिस्थिती नियंत्रणात आहे.