आरजे भूषण यांच्या संकल्पनेतील नाशिकची आठवण ताजी करून देणारं आगळंवेगळं गाणं
नाशिक – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मागील दीड वर्षांपासून बंद असलेली नाशिकमधील सोमेश्वर धबधबा, पांडवलेणी अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असो किंवा नवश्या गणपती, गंगाघाट, बालाजी मंदिर असो, सच्चा नाशिककर या सगळ्या गोष्टींना मुकतोय.. त्या ठिकाणी मित्र मैत्रिणी, परिवारा सोबत कधी एकदा परत जाऊन तिथली मजा एन्जॉय करूअसं प्रत्येकाला झालं आहे.
नाशिककरांची ही भावना लक्षात घेऊनच रेडिओ मिर्ची नाशिकचे आरजे भूषण यांनी ” ए यार, पुन्हा कधी एन्जॉय करू” या नवीन गाण्याची निर्मिती केली आहे.
मागील वर्षी खूप व्हायरल झालेल्या “माझ्या नाशिकला मी मिस करतोय” या गाण्यानंतर यंदा नाशिककर आता गाण्याच्या रूपाने नाशिकमधील सगळी ठिकाणे एन्जॉय करू शकणार आहेत.
उद्या शनिवार (दि.१०) रोजी दुपारी १ वाजता,मिर्ची भूषण (@mirchibhushan) या फेसबुक पेज व इन्स्टाग्राम (@mirchibhushan)अकाऊंट वर आणि मिर्चीमराठी (mirchi marathi) या युट्युब चॅनल वर हे गाणं प्रदर्शित होणार असून सर्व नाशिककरांनी संपूर्ण लॉकडाऊन मुळे घरी राहूनच डिजिटल स्क्रीनमार्फत त्यांच्या मनातील “नाशिक एन्जॉय करायचं आहे”
हे गाणे आरजे भूषण यांनी लिहिले असून त्यांनी गायले ही आहे, या गाण्याला संगीत मोहन उपासनी यांनी दिले असून या गाण्यासाठी बासरी वादन देखील केले आहे, गिटार नरेंद्र पुली सर, बेस गिटार निलेश (बाबा) सोनवणे, कीबोर्ड ईश्वरी दसककर तर ऑक्टोपॅड वर अभिजित शर्मा यांनी साथ संगत केली आहे.
पुष्कराज जोशी यांनी या गाण्याची पटकथा लिहिली असून रवींद्र जन्नावार यांनी हे या गाण्याचे दिग्दर्शन केले आहे तर हर्षल भुजबळ यांनी गाण्याचे एडिटिंग व मिक्सिंग केले आहे. गाण्यामध्ये आरजे भूषण यांनी स्वतः भूमिका केली असून त्यांच्यासमवेत नाशिकमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचा देखील समावेश आहे.