नाशिक शहरात २० ऑक्टोबरला ‘या’ भागात पाणी पुरवठा होणार नाही 

0

नाशिक – नाशिक शहरातील पंचवटी विभागाअंतर्गत पेठ रोड गंगापूर डावा तट कालव्याजवळ, दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभास पाणीपुरवठा करणारी उर्ध्ववाहीनी लिकेज झाल्याने सदरचे काम तातडीने करावयाचे आहे. सदर उर्ध्ववाहीनीचे दुरुस्ती करण्याचे  काम बुधवार दि.२० ऑक्टोबर २०२१ रोजी करण्यात येणार असल्याने शहरातील दुर्गानगर व मखमलाबाद जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.१ मधील शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै), , तसेच प्र.क्र. ६ मधील चांदशी रोड, गंगावाडी रोड, फडोळ मळा, रामकृष्ण नगर, पिंगळे नगर, एरिकेशन कॉलनी, मानकर नगर, महालक्ष्मी नगर, स्वामी विवेकानंद नगर, मानकर मळा, तवली डोंगर परिसर, कल्याणी व राजेय सोसा, मेहेरधाम, गॅसगोडावून, यशोदानगर, पेठरोड, इत्यादी परिसरात बुधवार दि.२०/१०/२०२१  रोजीचा दुपारचा  व  सायंकाळचा पाणी पुरवठा होणार नाही. अशी माहिती कार्यकारी अभियंतासा.आ.अ.वि. (पाणीपुरवठा विभाग वितरण) नाशिक महानगरपालिका यांनी दिली आहे. 
 
तसेच प्रभाग क्र.१ मधील दुर्गा नगर, शिव समर्थ नगर, जुई नगर, ओंकार बंगला परिसर शिवतेज नगर (पै.), श्रीधर कॉलनी (पै.) व प्र क्र ४ मधील कॅन्सर हॉस्पीटल मागिल परिसर, अनुसयानगर, कर्णनगर, समर्थनगर तुळजाभवानी नगर व हमालवाडी परिसर, पवार मळा परिसर तसेच प्र.क्र.६ मधील मखमलाबाद गांव, मखमलाबाद रोड पश्चिम भाग, मातोश्री नगर, विद्या नगर, वडजाई माता नगर, महादेव कॉलनी, कोळी वाडा, घाडगे नगर, एरिकेशन कॉलनी (पै.), मानकर नगर (पै.), जयमल्हार कॉलनी, अश्वमेघ नगर, सप्तरंग सोसा. इत्यादी परिसरात गुरुवार दि.२१/१०/२०२१ रोजीचा सकाळचा पाणीपुरवठा होणार नाही याबाबत परिसरातील नागरिकांनी नोंद घेऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले आहे. 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.