नाशिक जिल्ह्यात सद्यस्थितीत कोरोनाच्या ५ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू
जिल्ह्यात आजपर्यंत ४ लाख ५ हजार ७३५ रुग्ण कोरोनामुक्त
नाशिक – नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांचा आकडा १ हजाराच्या पुढे जातो आहे.ही चिंताजनक बाब आहे. राज्यसरकाने नुकतेच काही निर्बध लागू केले आहेत.शहरातील नागरीकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत असले तरी अनेक नागरीक अद्याप काळजी घेतांना दिसत नसल्याचे चित्र दिसते आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४ लाख ५ हजार ७३५ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.सद्यस्थितीत ५ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरू आहे. तसेच आत्तापर्यंत ८ हजार ७६५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे,अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक २१५,बागलाण ३९,चांदवड २७, देवळा २२, दिंडोरी १५९, इगतपुरी ८५, कळवण ३१, मालेगाव १३, नांदगाव ६५, निफाड ३०५, पेठ ०२, सिन्नर ११३, सुरगाणा ०७, त्र्यंबकेश्वर २३, येवला २५ असे एकूण १ हजार १३१ पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ३ हजार ९५५, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५५ तर जिल्ह्याबाहेरील २०३ रुग्ण असून असे एकूण ५ हजार ३४४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४ लाख १९ हजार ८४४ रुग्ण आढळून आले आहेत.
नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेले बाधित रुग्ण
नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ६४, बागलाण १४, चांदवड ०७, देवळा ०७, दिंडोरी ४२, इगतपुरी ३४, कळवण ०६,मालेगाव ०१, नांदगाव २४, निफाड ८६,पेठ ०२, सिन्नर ३७, सुरगाणा ०४, त्र्यंबकेश्वर ०९, येवला १२ असे एकूण ३४९ पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
रुग्ण बरे होण्याची टक्केवारी
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीण मधे ९६.६३ टक्के, नाशिक शहरात ९६.६४ टक्के, मालेगाव मध्ये ९६.७७ टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.८२ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६४ इतके आहे.
मृत्यु :
नाशिक ग्रामीण ४ हजार २५१ नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ४ हजार ३०,मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ३५८ व जिल्हा बाहेरील १२६ अशा एकूण ८ हजार ७६५ रुग्णांचा मृत्यु झाला आहे.
लक्षणीय :
४ लाख १९ हजार ८४४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ४ लाख ५ हजार ७३५ रुग्ण पुर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज.
सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ५ हजार ३४४ पॉझिटिव्ह रुग्ण.
जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ९६.६४ टक्के.
(वरील आकडेवारी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)